पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्ध महिलेला फसवणाऱ्या ४ आरोपींविरोधात गुन्हा नोंद !

चार अज्ञात आरोपींनी ठाणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली. त्यांनी पोलीस असल्याचे भासवून महिलेचे १ लाख २० सहस्र रुपये किमतीचे दागिने पळवले.

कल्याण येथे गोवंशियांचे मांस असणाऱ्या टेंपोवर कारवाई !

कठोर शिक्षेअभावीच धर्मांध गोवंशियांची हत्या करण्याचे धाडस करत आहेत.

दंड रहित करण्याच्या मंत्रीमंडळाचा निर्णयाला किरीट सोमय्या यांचे न्यायालयात आव्हान !

ठाणे येथील विहंग गार्डन इमारतीमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आस्थापनाला ठाणे महापालिकेने १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

ठाणे येथील सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट !

सभेसाठी राज ठाकरे उपस्थित होतांना त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार स्वागत केले. तेव्हा सभेचे आयोजन करणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे तलवार सुपुर्द करत ती उपस्थितांना दाखवण्याचे आवाहन केले.

पितांबरीचे परीक्षित प्रभुदेसाई ‘युवा कोकण आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित !

‘ग्लोबल कोकण’ या मान्यवर संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘युवा कोकण आयडॉल’ पुरस्कार पितांबरी प्रोडक्ट्स प्रा.लि.चे उपाध्यक्ष श्री. परीक्षित प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला.

छत्रपती शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी देवाची उपासना करणे आवश्यक ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी आपण नियमित देवाची उपासना करणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी काढले.

विरार येथे दुचाकीची सायकलला धडक, सायकलस्वाराचा मृत्यू !

सणांच्या नावाखाली असे विकृत प्रकार करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार बंद होतील ! सणांच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे सातत्याने प्रबोधन करणे, निवेदने देणे आदी माध्यमांतून जनजागृती करत आहे !

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भवनात नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांकडून दारूची ‘पार्टी’ !

अशा प्रकारच्या दारूच्या मेजवान्या या इमारतीत होत असतील, तर तैनात सुरक्षारक्षक नेमके करतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणे ते दिवा मध्य रेल्वेच्या ५ व्या आणि ६ व्या नव्या मार्गिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा कंदील !

या मार्गिकांमुळे आता रेल्वेप्रवास अधिक जलदगतीने होणार असून मध्य रेल्वे मार्गावर ३६ नव्या लोकल गाड्या चालू होत असल्याची घोषणा त्यांनी केली, तर काही वर्षांत ४०० ‘वन्दे भारत ट्रेन’ चालू करणार असल्याचे सांगितले.

भिवंडी येथे ‘बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्रा’च्या वतीने काढ्याचे विनामूल्य वाटप !

याचा लाभ २५३ जणांनी घेतला. कोरोना संसर्गाच्या काळात सेवाकार्य करणार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.