डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीला धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

डोंबिवली येथील एका अल्पवयीन मुलीसमवेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थान येथील सोहेल सलामउद्दीन खान (वय १८ वर्षे) याने मैत्री केली आणि तिला विविध प्रकारची आमीषे दाखवली. त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

ठाणे येथे महिला पोलीस कर्मचार्‍याची पोलीस ठाण्यात आत्महत्या !

येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ ऑगस्टच्या दुपारी उघडकीस आली.

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी महामंडळांची अथवा स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे !

गड-दुर्गांवर अनुचित प्रकार, विद्रुपीकरण होणे, वणवे लावले जाणे असे प्रकार घडत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.

भिवंडी येथे खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू !

नागरिकांचे मृत्यू होऊनही रस्ते दुरुस्त न होणे प्रशासनाला लज्जास्पद !

कळवा येथे मदरशातील मारहाणीला कंटाळून ५ मुलांचे पलायन !

हे आहे मदरशांचे वास्तव ! मुलांचा छळ करणार्‍या अशा मदरशांवर बंदीच घालायला हवी !

‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ भव्य कावळ पदयात्रा पार पडली !

‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ अशी भव्य कावळ पदयात्रा नुकतीच काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये सर्व हिंदु संघटनांचे सदस्य, पदाधिकारी, हिंदु युवा वाहिनीचे सदस्य, तसेच बदलापूर आणि अंबरनाथ येथील शिवभक्त यांनी भगवे वस्त्र परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मीरारोड येथे खंडणीसाठी अपहृत मुलाची हत्या करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

२५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी १३ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करणारे अफझल अन्सारी (वय २२ वर्षे) आणि इम्रान शेख (वय २४ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘स्वाईन फ्ल्यू’च्या रुग्णसंख्येत वाढ; तिघांचा मृत्यू !

ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपलिका, २ नगरपालिका आणि ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख १७ सहस्र ५९० संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ३४ जणांच्या चाचणीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

देशविरोधी घटनांचा निषेध करत ठाणे, उल्हासनगर आणि मुलुंड येथे हिंदुत्वनिष्ठांची पदयात्रा !

दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी पदयात्रा आल्यावर हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करून पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत सर्व जाती-पंथाचे लोक, तसेच पक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कल्याण येथे ज्येष्ठ शिवसैनिकावर आक्रमण !

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कल्याण पूर्व येथील समर्थक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर २० जुलै या दिवशी सकाळी ४ ते ५ जणांनी आक्रमण केले. या आक्रमणात पालांडे हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत.