सीबीआयच्या उपअधीक्षकांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न

‘सीबीआय’चे उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?

आतंकवाद्याच्या सुटकेसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त अरब अमिरातच्या दूतावासाला साहाय्य !

केंद्रशासनाने या आरोपाकडे गांभीर्याने पाहून याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असेच जनतेला वाटते !

शाळांना रविवारऐवजी शुक्रवारची सुटी, म्हणजे झारखंडची इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल !

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.

अशासकीय संस्थांची (‘एन्.जी.ओ.’ची) विश्वासार्हता !

विदेशातून निधी मिळवून देशातील विकासकामांना स्थगिती आणणार्‍या अशासकीय संस्थांचे खरे स्वरूप सरकारने उघड करावे !

नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.

सोनिया गांधी यांना ‘ईडी’कडून २१ जुलैला चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचा समन्स !

‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक अपव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे ‘एस्.आय.टी.’कडे असलेले अन्वेषण ‘एटीएस्’कडे वर्ग करण्याची मागणी कॉ. पानसरे यांच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

दक्षिण कन्नड जिल्ह्यात अवैधपणे वास्तव्य करणार्‍या परदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करा ! – कर्नाटकचे गृहमंत्री

‘व्हिसा’ची मुदत संपूनही आणि वैध कागदपत्रे नसतांनाही कर्नाटकात रहाणार्‍या परदेशी नागरिकांचा शोध घेणे, हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असल्याचे ज्ञानेंद्र म्हणाले.

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !