‘पद्मावती’ चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवरील रांगोळी पुसल्याच्या प्रकरणी करणी सेना आणि विहिंप यांच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

येथे ‘पद्मावती’ चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेली रांगोळी काही धर्मप्रेमींनी पुसल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी करणी सेना आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

भाजपच्या विरोधानंतर ‘मार्शल’ चित्रपटातून जीएस्टीच्या विरोधातील प्रसंग हटवला जाणार

दक्षिण भारतीय चित्रपटांतील अभिनेता विजय यांचा नुकताच प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट ‘मार्शल’मध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) यांवर टीका असणारा प्रसंग असल्यामुळे तो हटवण्याची मागणी तमिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन् यांनी केली होती.

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ६ मराठी चित्रपटांची निवड

गोवा येथे होणार्‍या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ६ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये झाला बोभाटा, पिंपळ, फिरकी, दशक्रिया, हृदयांतर आणि बंदुक्या, या सहा चित्रपटांचा समावेश आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती’ चित्रपटाचा ‘ट्रेलर’ ११ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला करणी सेनेने विरोध केला आहे. प्रारंभापासूनच करणी सेनेचा या चित्रपटाला विरोध होता.

बॉलीवूड चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका यांतून हिंदूंची प्रतिमा मलीन करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्र !

१. ब्राह्मण – ढोंगी पंडित, गुंड किंवा बलात्कारी. २. क्षत्रिय/राजपूत – क्रूर आणि बलात्कारी. ३. वैश्य/सावकार – लोभी, कंजुश किंवा बलात्कारी.

…..तर महाराष्ट्रात राणी पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – ठाकूर अजयसिंह सेंगर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

राणी पद्मावतीला आपले करण्यासाठी खिलजी याने अनेक प्रयत्न केले; मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर झालेल्या युद्धात खिलजी याच्या हातात जिवंत पकडले जावू नये

‘हलाल’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रविकास सेनेचे आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेतले !

समाज प्रबोधन करणारा ‘हलाल’ हा क्रांतीकारी चित्रपट सांगली-कोल्हापूर परिसरातील चित्रपटगृहात दाखवण्यात यावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोणत्याही प्रकारची आंदोलन करण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात यावी

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अश्‍लिल चित्रपट पाहून मित्रावर अत्याचार केल्याप्रकरणी २ शालेय विद्यार्थ्यांवर गुन्हा प्रविष्ट

अश्‍लिल चित्रपट पाहून बालमनावर किती विपरित परिणाम होत आहे, यावर प्रकाश टाकणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

समाजप्रबोधन करणारा ‘हलाल’ चित्रपट बंद पाडू इच्छिणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करा ! – राष्ट्रविकास सेनेचे जिल्हाधिकार्‍यांंच्या नावे निवेदन

समाजात पालट होण्याच्या दृष्टीने आणि प्रबोधन या अनुशंगाने ‘हलाल’ हा क्रांतीकारी चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सर्व कलाकार यांनी जीव ओतून समाजातील अपप्रवृत्ती संपून समाज जागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे


Multi Language |Offline reading | PDF