हा दंड तृणमूल काँग्रेसकडून वसूल करा !

राजकारणावर टीका करणारा बंगाली चित्रपट ‘भोविष्योतेर भूत’चे प्रदर्शन रोखल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

‘द ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधील एका बड्या कुटुंबाचा दबाव ! – दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा आरोप

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची हत्या घडवून आणल्याचे आजही सांगितले जाते. असे असतांना तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याविषयीचे सत्य जगासमोर आणणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. ‘हे पाप जगासमोर येऊ नये; म्हणून काँग्रेस या चित्रपटाला विरोध करत आहे’, असे राष्ट्रप्रेमींना वाटल्यास चूक ते काय ?

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

मूर्तींना हानी होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि राज्यातील काँग्रेस सरकार झोपले होते का ? अन्य धर्मियांच्या धर्मस्थळी चित्रीकरण करण्यास अशा प्रकारची अनुमती देण्याआधी पुरातत्व विभाग किंवा राज्य सरकार यांनी १०० वेळा विचार केला असता; मात्र हिंदू सहिष्णु असल्याने त्यांना वारंवार गृहित धरले जाते !

‘रामजन्मभूमी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

‘रामजन्मभूमी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी परिसंवादाचे आयोजन

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ‘भीतीची भीती’ (scare of fear) या विषयावर तरुण पत्रकार कृष्णा दे आकाश यांनी १६ मार्च २०१९ या दिवशी शहरात परिसंवादाचे आयोजन केले होते.

भारताच्या कारवाईमुळे पाककडून भारतीय चित्रपटांवर बंदी

भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकने आणखी काही करता येत नाही; म्हणून भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे. यामुळे भारताचा कुठलाही चित्रपट आता पाकमध्ये प्रदर्शित होणार नाही, असे पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी घोषित केले आहे.

मॉडेलला ब्लॅकमेल करणार्‍या प्रॉडक्शन मॅनेजरला अटक !

२८ वर्षीय मॉडेल तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला आक्षेपार्ह छायाचित्र आणि चित्रफीती यांच्या आधारे ब्लॅकमेल करणारा प्रॉडक्शन मॅनेजर एकलव्यसिंग तक्षक (वय २७ वर्षे) याला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

‘मणिकर्णिका’ चित्रपटाला विरोध करणार ! – सुहास शिंदे सरकार, संस्थापक अध्यक्ष, श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

‘मणिकर्णिका’ चित्रपटात ऐतिहासिक ग्वाल्हेर घराण्याच्या इतिहासावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे अखिल महाराष्ट्रातून ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाला प्रखर विरोध करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे सरकार यांनी पुसेसावळी (सातारा) दिली.

मध्यप्रदेशात प्रजासत्ताकदिनी ‘गदर’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य करणार्‍या मुलांवर धर्मांधांचे सशस्त्र आक्रमण

‘गदर’ चित्रपटामध्ये शीख युवक आणि पाकिस्तानी मुसलमान युवती यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील शीख युवक हा प्रखर राष्ट्राभिमानी दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पाकप्रेमी धर्मांधांचा या चित्रपटावर आक्षेप आहे.

कोलकाता येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे चित्रपटगृहावर आक्रमण

‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध – हिंदूंनी वैध मार्गाने केलेला विरोध डावलून सरकार हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन असलेल्या चित्रपटांना अभय देते, तर काँग्रेसी टोळी थेट कायदा हातात घेऊन चित्रपटगृहाचे खेळ बंद पाडते ! यावरून ‘सरकारला हीच भाषा समजते’, असे समजायचे का ?


Multi Language |Offline reading | PDF