चित्रपटांसाठी २४ घंटे चालणार्‍या वाहिन्या असू शकतात, मग शिक्षणासाठी का असू नये ? – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात अपंग आणि विशेष मुलांसह ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वतंत्र शिक्षण वाहिनी का चालू नाही ? हे सरकारच्या का लक्षात येत नाही ? न्यायालयाला का सांगावे लागते ?

अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी.’ माध्यमांवर कठोर कारवाई करावी ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत.

मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता ! – अभिनेत्री कंगना राणावत

आपल्याला मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याप्रकरणी उद्योजक राज कुंद्रा यांना अटक !

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक केली आहे. १९ जुलैच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

गुलामगिरीची मानसिकता !

चित्रपट कलाकार या वलयांकित व्यक्ती असल्याने त्या समाजाला आणि विशेषतः युवा पिढीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करत असतात. अनेक जण त्यांचे किंवा त्यांच्या विचारांचे अनुयायी होतात.

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवणारे चित्रपटसृष्टीवाले ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा उपयोग चित्रपटसृष्टी कधीतरी करते का ? अन्य धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आहेत, मग हिंदूंच्या श्रद्धेचे काय ? हीच भारताची धर्मनिरपेक्षता आहे का ?

(म्हणे) ‘कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी चित्रपटाचे नाव पालटणार !’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान किंवा आक्षेपार्ह चित्रण करून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे.

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

साजिद नाडियाडवाला हे प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव देण्याचे धाडस दाखवले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ऊठसूठ कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केला !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने २४ जून या दिवशी पत्राद्वारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांना कळवली आहे.

अश्‍लीलतेचा प्रसार करणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीचे अनुकरण करणे पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनी बंद केले पाहिजे ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारतीय चित्रपटसृष्टीला तिच्या चित्रपटांतील अश्‍लीलतेवरून दोन शब्द सुनावण्याचे धाडस भारतातील शासनकर्ते कधी करतील का ?