(म्हणे) ‘भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर दक्षिण गोलार्धात उतरले ! – चीन

चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !

६ ऑक्टोबरपर्यंत ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ जागे होण्याची प्रतीक्षा करू ! – इस्रो

चंद्रयान-३चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवार उतरल्यानंतर १४ दिवस त्यांनी तेथील माहिती पाठवली. १४ दिवसांनी तेथे त्यापुढील १४ दिवसांसाठी सूर्य मावळल्याने अंधार झाला. या काळात येथे प्रचंड थंडी असते. त्यामुळे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे काम इस्रोकडून बंद करण्यात आले होते.

‘नासा’ने काढले चंद्रावर उतरलेल्या ‘चंद्रयान-३’चे छायाचित्र !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.

चंद्रावर सापडला प्राणवायू !

भारताच्या ‘चंद्रयान-३’ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर या रोबोटने चंद्रावर प्राणवायू (ऑक्सिजन) असल्याचे शोधले आहे. यासह या रोव्हरला त्याला चंद्रावर ८ खनिजेही सापडली आहे.

‘चंद्रयान-३’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या दिशेने आध्यात्मिक वाटचाल !

‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वी उतरण्याविषयी जाणवलेल्या सूक्ष्मातील गोष्टी