(म्हणे) गोरक्षकांमुळे मुसलमानांचे जगणे कठीण झाले आहे !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा कांगावा

गोरक्षकांमुळे मुसलमानांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना जगण्याची भीती वाटत आहे. या गटावर त्वरित कारवाई करून त्यांना शिक्षा द्यायला हवी; मात्र केंद्र सरकारचे काही मंत्री या गोरक्षकांच्या गळ्यात माळा घालत आहेत आणि काहींवर केलेल्या कारवाईत गडबड करून त्यांना मुक्त केले जात आहे.

कसायांवर कारवाई न करता खोटे गुन्हे नोंदवून पोलिसांनी गोरक्षकांना केले तडीपार

पापडी (वसई) येथे ईदच्या कालावधीत आणलेले गोवंश कापण्यासाठी नसून तबेल्यासाठी असल्याचे सांगत कसायांची बाजू घेऊन महाराष्ट्र शासनाचे मानद पशुकल्याण अधिकारी तथा गोरक्षक राजेश पाल यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवणार्‍या वसई पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.