सातारा जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालणार्‍या तृतीयपंथीयांवर गुन्हा नोंद !

जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्य पोळ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगितल्यामुळे चिडून तृतीयपंथीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

अंबानींना ‘हेलिपॅड’ची अनुमती मिळण्यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या वाहनाचे प्रकरण घडवून आणले  ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महत्त्वाच्या सूत्रावर चर्चा होऊ नये, यासाठी भाजपनेच या सूत्रावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या दोन्ही ठिकाणच्या जनसुनावणीच्या वेळी गदारोळ

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची रवींद्र भवन, मडगाव आणि कला अकादमी, पणजी अशी दोन्ही ठिकाणी ७ मार्चला जनसुनावणी झाली. या दोन्ही ठिकाणी जनसुनावणीच्या वेळी नागरिकांनी गदारोळ घातला

भाजप आमदारांकडून आर्णी नगरपालिकेत अपहार करणार्‍या बांधकाम अभियंत्याला निलंबित करण्यासाठी गोंधळ !

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपालिकेतील बांधकाम अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून मान्सूनपूर्व कामात लाखो रुपयांचा अपहार केला असल्याने बांधकाम अभियंता नीलेश राठोड यांना निलंबित करण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी आर्णी येथील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत २ मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात केली.

विधानसभेत वैधानिक विकास मंडळाच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वैधानिक विकास मंडळ सिद्ध करण्याच्या कारणावरून खडाजंगी झाली.

पुण्यात लसीकरणासाठी मोठी गर्दी; कमला नेहरू रुग्णालयात गर्दीमुळे गोंधळ !

लसीकरणाचे नियोजन भोंगळपणे करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद! ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास सोसावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे !

नगरसेवकांच्या समर्थकांचा ठोसेघर (जिल्हा सातारा) येथे मद्यप्राशन करून धिंगाणा

अरेरावी करणार्‍या मद्यपींवर नियंत्रण मिळवू न शकणारे स्थानिक प्रशासन !

शेतकर्‍यांच्या सूत्रांवरून राज्यसभेत गोंधळ घालणारे आपचे ३ खासदार दिवसभरासाठी निलंबित

गोंधळ घालणार्‍या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यावरून झालेल्या गोंधळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित !

जसे वर्गात गोंधळ घालणार्‍या मुलांना शिक्षा केली जाते, त्याच प्रकारे संसदेत गोंधळ घालणार्‍या सदस्यांवर कारवाई होणे आवश्यक ! संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे होणार्‍या पैशांचा अपव्य लक्षात घेता हा निधीही अशा बेशिस्त सदस्यांकडून वसुल करा !

अमेरिकेतील संसदेमधील हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू

जगातील बलाढ्य महासत्ता असणार्‍या अमेरिकेत असे घडते, हे लज्जास्पद ! इतर वेळी लोकशाही, मानवाधिकार आदी सूत्रांवरून भारताला सुनवणार्‍या अमेरिकेने स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजवणे किती आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !