दादर आणि बोरीवली येथे श्रीमद्भगवद्गीतेचे संथावर्ग चालू होणार !

दादर (पश्‍चिम) आणि बोरीवली (पश्‍चिम) येथे आबालवृद्धांसाठी श्रीमद्भगवद्गीतेचे संथावर्ग चालू होणार असून यात संपूर्ण गीता (१८ अध्याय, ७०० श्‍लोक) संथा पद्धतीने विनामूल्य शिकवण्यात येणार आहे. ‘या वर्गांचा लाभ घ्यावा’, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार दूर होऊ शकतात !- भारत, बांगलादेश आणि पाक येथील संशोधकांचे संशोधन

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार बरे होतात, असे संशोधन भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांच्या या पथकामध्ये भाग्यनगर येथील ‘उस्मानिया जनरल हॉस्पीटल’च्या डॉक्टरांचाही समावेश होता.

भगवद्गीतेचे वावडे का ?

नॅक मूल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील केवळ अशासकीय अन् अनुदानित १०० महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे निःशुल्क वाटप करण्यास महाराष्ट्र शासनाने भक्ती वेदांत संस्थेला अनुमती दिली आहे.

मुंबईतील १०० अशासकीय महाविद्यालयांमध्ये होणार भगवद्गीतेचे वाटप !

नॅक मूल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील केवळ अशासकीय अन् अनुदानित १०० महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे वाटप केले जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवद्गीतेच्या १०० संचांचे वाटप करण्याच्या सूचना …….

भगवद्गीता संघर्षकाळात जन्मली असल्याने ती जीवनाच्या प्रारंभीच हातात पडली पाहिजे ! – सौ. धनश्री तळवलकर, स्वाध्याय परिवार

आज प्रत्येक जण म्हणतो की, समाज बिघडला आहे. खरेतर आपण बिघडलो; म्हणून समाज बिघडला आहे. या स्थितीला आपणच उत्तरदायी असून आपण स्वतःतील सत्त्वगुण हरवून बसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.

श्रीमद्भगवद्गीता माझ्या प्रतिदिनच्या जीवनात प्रेरणा देत आहे ! – हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ

श्रीमद्भगवद्गीता माझ्या प्रतिदिनच्या जीवनात प्रेरणा देत आहे. गीता केवळ भारतियांच्याच नव्हे, तर विदेशातील अनेकांच्या प्रशंसेस पात्र ठरली आहे, असे उद्गार हॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते विल स्मिथ यांनी काढले.

उत्तरप्रदेशमध्ये शालेयस्तरावर श्रीमद्भगवद्गीता गायन स्पर्धेचे आयोजन करण्याचा सरकारचा आदेश

उत्तरप्रदेशमधील सर्व शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित गायन स्पर्धा आयोजित करण्याचा आदेश योगी आदित्यनाथ सरकारने दिला आहे.

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भ्रष्टाचार संपवण्याचे सामर्थ्य ! – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

कायद्याचा बडगा उगारून आपण भ्रष्टाचाराला लगाम घालू शकतो; मात्र भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करायचे असेल, तर लोकांचे राहणीमान उंचावण्याला पर्याय नाही.

आय्आय्टी कानपूरकडून वेद, गीता यांवर आधारित संकेतस्थळाची निर्मिती

कानपूर – आय्आय्टी कानपूरने वेद, गीता आणि इतर शास्त्रे यांवर gitasupersite.iitk.ac.in/ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या ग्रंथांतील प्रत्येक श्‍लोक विविध भाषांमध्ये या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत.

कृतज्ञता कि आभार ?

श्री मद्भगवद्गीतेचे पठण स्पर्धा जिंकणार्‍या ओडिशाच्या सोवानिया शिक्षाश्रममध्ये शिकणारी ५ वर्षांची मुसलमान विद्यार्थिनी फिरदौस हिच्या पालकांवर स्थानिक मौलवींनी घातलेल्या दबावानंतर तिची शाळा पालटण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now