जिहादी आतंकवाद्यांकडून आता काश्मीरमध्ये चिनी ग्रेनेडचा वापर

पाकिस्तान काश्मीरमधील आतंकवाद्यांना चिनी ग्रेेनेड पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत सुरक्षादलांनी आतंकवाद्यांकडून ७० चिनी ग्रेनेड जप्त केले आहेत.

मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांची बाजू घेणार्‍यांवर आता कोणी दगडफेक करत असेल, तर त्याचे दुःख राष्ट्रभक्त जनतेला होईल का ?

भाजपच्या काश्मीरमधील मुसलमान उमेदवाराचा कलम ३७० आणि ३५ अ रहित करण्याला विरोध

केवळ मते मिळवण्यासाठी भाजप हिंदूंना मूर्ख बनवतो, हे लक्षात घ्या ! गेली ५ वर्ष सत्तेत असतांना भाजपने आश्‍वासन देऊनही ही कलमे काढली नाहीत, यामागील कारण आता समोर आले आहे ! आता परत भाजप सत्तेत आल्यावरही तो ही कलमे काढणार नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

काश्मीर कुणाच्या बापाचे नाही, हे मोदी आणि इम्रान खान यांनी लक्षात घ्यावे ! – एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी

ओवैसी पुढे म्हणाले की, पाकिस्तानात लष्कराच्या साहाय्याविना निवडणुका होत नाहीत; पण आज त्या देशाचा पंतप्रधान आणि लष्कर आमच्या देशातील निवडणुकीविषयी बोलत आहेत.

पुलवामा येथील आक्रमणाच्या कटाची माहिती होती ! – जैशचा आतंकवादी निसार अहमद तांत्रे याची स्वीकृती

देशातील आतंकवाद्यांना आक्रमणांच्या कटांची माहिती मिळते आणि सरकार मात्र आक्रमण झाल्यानंतर जागे होते !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात संघ स्वयंसेवक आणि त्यांचे सुरक्षारक्षक ठार

येथील जिल्हा रुग्णालयातील मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चंद्रकांत शर्मा यांच्यावर ९ एप्रिलला दुपारी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते आणि त्यांचा सुरक्षारक्षक ठार झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फुटीरतावाद्यांसमवेत शोभत नाहीत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे, त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत.

(म्हणे) ‘कलम ३७० समाप्त केल्यास स्वतंत्र होऊ !’ – फारूख अब्दुल्ला यांची धमकी

वडील शेख अब्दुल्ला यांनाही जे जमले नाही, ते करण्याच्या फुकाच्या घोषणा फारूख अब्दुल्ला यांनी देऊ नयेत ! भाजप सरकार अशा प्रकारची देशद्रोही विधाने करणार्‍या अब्दुल्ल्ला पिता-पुत्र, मेहबूबा मुफ्ती यांना कारागृहात का डांबत नाही ?

काश्मीरमध्ये प्रचाराच्या वेळी भाजप भगव्याऐवजी हिरव्या रंगात !

सत्तेसाठी काहीही करण्यास सिद्ध असलेल्या भाजपचा हाच खरा तोंडवळा आहे, हे लक्षात घ्या ! एकीकडे ‘गोहत्येच्या विरोधात आहे’, असे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करतो, तर दुसरीकडे गोवा, मिझोराम येथे ‘गोमांस पुरवू’ असे आश्‍वासन देतो. त्याचप्रमाणे आता भाजपने काश्मीरमध्येही त्याचा ‘रंग’ दाखवला आहे !

जम्मू-काश्मीरमध्ये ४०० हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात येणार

हे नेते आतंकवादाच्या विरोधात आवाज उठवतात का ? त्यामुळेच त्यांच्या जिवाला धोका आहे का ? याची निश्‍चिती सरकारने सुरक्षा देतांना केली आहे का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now