श्रीरामनवमीनिमित्त विक्रोळी पार्कसाईट येथील बजरंग दल आणि निळकंठेश्‍वर मंदिर यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने विक्रोळी पार्कसाईट येथील बजरंग दल आणि निळकंठेश्‍वर मंदिर यांच्या वतीने प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

रामनवमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ संपन्न !

आता हिंदूंना प्रभु श्रीराम एकमेव आधारस्तंभ राहिले आहेत. यासाठी राममंदिर आणि रामराज्य यांची कामना करणार्‍या समस्त हिंदु समाजाने श्रीरामाला साकडे घालावे, श्रीरामाचा नित्य जप आणि प्रार्थना करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आयोजित पदयात्रेत मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग

फाल्गुन अमावास्येच्या दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली. त्यांच्या बलीदानाचे स्मरण समस्त हिंदु समाजाला व्हावे, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने बलीदान मास पाळून त्यानंतर ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येतात.

साधना आणि धर्माचरण केल्यास जीवनामध्ये आमूलाग्र पालट होतो ! – शंभू गवारे, पूर्वोत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

व्यवसाय करतांना साधना आणि धर्माचरण केल्यास व्यवसायामधूनही साधना होईल. साधना केल्याने जीवनात अमूलाग्र पालट होतो, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी येथील व्यावसासिकांसमवेत झालेल्या बैठकीत केले.

मंगळूरू, कर्नाटक येथे भावपूर्ण वातावरणात पार पडले धर्मप्रेमींचे राज्यस्तरीय शिबिर

येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये अलीकडेच धर्मप्रेमींसाठी कर्नाटक राज्यस्तरीय शिबिर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले.

चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव

येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला. सत्संगाच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या सौ. सुधा यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी रामनवमी आणि तमिळ नववर्ष यांविषयी महत्त्व सांगितले.

मेकॉले शिक्षणपद्धतीद्वारे हिंदूंच्या मनातून काढलेला धर्म आज पुन्हा शिकवण्याची आवश्यकता ! – आनंद जाखोटिया

मेकॉले शिक्षणपद्धतीने हिंदूंच्या मनातील धर्म काढून टाकण्यात आला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आजतागायत हीच शिक्षणपद्धत रेटली जात आहे. त्यामुळे उपासना, धर्माचे आचरण, धर्माची शिकवण यांपासून हिंदू दूर जात आहेत.

पुणे येथील वेदभवनच्या वतीने शत्रूच्या पराजयासाठी श्रीनगर येथे मन्युसूक्त जपानुष्ठान

वेदभवनाच्या माध्यमातून गेली ७३ वर्षे वेदांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य केले जात आहे. विविध शहरांमध्ये यज्ञ, तसेच व्याख्याने आयोजित करून लोकांच्या मनात वेदांप्रती निष्ठा आणि प्रेम जागृत करण्याचे काम करण्यात येते.

भारताचा चीनच्या बीआरआय (बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह) परिषदेवर सलग दुसर्‍यांदा बहिष्कार

बहिष्कार घातला, हे चांगलेच झाले; मात्र त्याही पुढे जाऊन चीनला धडा शिकवण्यासाठी भाजप सरकारने आणखी कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !

सैन्याने सिंधू नदीवर २६० फूट लांबीचा झुलता पूल बांधला

भारतीय सैन्य अल्पावधीत पूल बांधू शकते, तर सरकारला का बांधता येत नाही ? बांधलेले पूलही टिकावू ठरत नाहीत, असे का होते ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now