राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये घट, २७ तंत्रनिकेतन महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव

राज्यात पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घटत आहे. २७ तंत्रनिकेतन संस्थाचालकांनी महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव नवी देहली येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे पाठवला आहे.

पुरंदरे तालुक्यात जलशिवार योजनेत २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा विधान परिषदेत विरोधकांचा आरोप

राज्यातील जलशिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पुरंदरे तालुक्यात जलशिवार योजनेत २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी १ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला.

काश्मिरी हिंदूंची समस्या ही विश्‍वातील प्रत्येक हिंदूची समस्या ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘फर्स्ट थिंक टँक कॉन्क्लेव्ह : काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. तेथील हिंदूंवर वर्ष १९९० मध्ये झालेले अत्याचार आणि त्यांच्या समस्या या केवळ काश्मिरी हिंदूंच्या नाहीत, तर संपूर्ण विश्‍वातील हिंदूंच्या समस्या आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय  मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केले.

अनुदानाच्या अभावी महाराष्ट्रात औषधी वनस्पती लागवडीची योजना रखडली !

औषधी वनस्पतींचे जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन अशा वनस्पतींची लागवड करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला पटवून देणे आवश्यक आहे !

कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करणे, हे काँग्रेसचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र ! – खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

‘समझौता एक्सप्रेस’मधील बॉम्बस्फोट प्रकरणात चिदंबरम् यांनी याविषयी स्वत:च्या हाताने ‘अ‍ॅफिडेविट’ सिद्ध केले. मालेगाव बॉम्बस्फोटातही हाच प्रकार करण्यात आला. कर्नल प्रसाद पुरोहित यांना केवळ पुढे करण्यात आले. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र केले. – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक

‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पालघर जिल्ह्यात कुपोषणाने एकही मृत्यू नाही ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे

अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा आणि स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा, यासाठी बालआरोग्य केंद्र चालू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग, महिला आणि बाल विकास विभागाने संयुक्तिकरित्या ……

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी बिंदू चौकात सामुदायिक शपथ

‘माझी मातृभाषा मराठी ! या भाषेचा सन्मान या भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा यांसाठी मी शपथबद्ध आहे’, अशा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

३ ते २२ जुलै या कालावधीत श्री विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन बुकिंग बंद रहाणार

आषाढी यात्रेत दर्शनाला येणार्‍या भाविकांची सोय व्हावी यासाठी ३ ते २२ जुलै या कालावधीत ऑनलाइन दर्शन बुकिंग सेवा बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे.

सातारा येथे ३ आणि ४ जुलै या दिवशी ‘राजमाता महाराणी येसूबाई त्रिशताब्दी सोहळ्या’चे आयोजन

४ जुलै १७१९ या दिवशी राजमाता येसूबाई २९ वर्षे मोगलांच्या कैदेतून देहलीहून दक्षिणेत परत आल्या. सातारा येथील वेशीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.


Multi Language |Offline reading | PDF