सांगली महापालिकेच्या चंद्रनमस्काराची ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने मतदार जागृतीचा एक उपक्रम म्हणून कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी स्टेडियमवर चंद्रनमस्कार घालण्यात आले.

‘भावसत्संग चालू व्हावे’, असे वाटत असतांना त्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्यानंतर भावसत्संगाना झालेला आरंभ !

‘एरव्ही मला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मनातील विचार मोकळेपणाने सांगता येत नाहीत; मात्र भावसत्संगात मला ते सहजपणे सांगता आले. ‘या सत्संगाच्या माध्यमातून भगवंताच्या एका वेगळ्याच विश्‍वात काही काळ राहता येते’, हे मी अनुभवले.

बेळगाव येथील गावांत श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

करल्गा (खानापूर) गावात श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात हिंदु जनजागृती समितीचे श्री. कोनेरी कुम्रतवाडकर यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ ३०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.

वडगाव (पुणे) येथील राजमाता जिजाऊ नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण

राजमाता जिजाऊ नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने ७ ऑक्टोबर या दिवशी नवदुर्गा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त धर्मशिक्षणाचा जागर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचनांच्या माध्यमातून ‘नवरात्रीचे शास्त्र आणि साधनेचे जीवनातील महत्त्व’ आदी विषयांची माहिती देण्यात आली.

वणी-आदिलाबाद रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यांना वेग

माजरी-वणी-आदिलाबाद  या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याची मागणी मान्य झाली आहे. या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने झालेल्या पथसंचलनात १ सहस्र ८०० स्वयंसेवकांचा सहभाग

प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने यंदाही विजयादशमीला पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले.

भांडुप येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवरात्रोत्सव मंडळांचा कृतीशील सहभाग

रायगड जिल्ह्यात धर्मप्रेमींना विजयादशमीच्या शुभेच्छा आणि ‘सनातन पंचांग २०२०’चे वितरण

जिल्ह्यातील रा.स्व. संघ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान बजरंग दल आदी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ धर्माची उपासना केली ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ धर्म, स्वातंत्र्य आणि यवनमुक्तता यांची उपासना केली, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF