(म्हणे) ‘देहलीमध्ये मुसलमानांवरील आक्रमणामुळे आम्ही चिंतीत !’- अमेरिकी संस्थेची प्रतिक्रिया

‘युनायटेड स्टेटस कमिशन फॉर इंटरनेशनल रिलिजियस फ्रीडम’ ! देहलीमध्ये अल्पसंख्यांकांनी हिंदूंवर आक्रमणे केली आहेत, ही वस्तूस्थिती असतांना जाणीवपूर्वक हिंदूंना आक्रमणकर्ते दाखवून खर्‍या आक्रमणकर्त्यांचा बचाव करणार्‍या अशा संघटनेवर भारताने उत्तर दिले पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

सीएए आणि देहलीतील हिंसाचार हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न !

सीएए आणि त्या अनुषंगाने देहलीत होत असलेला हिंसाचार हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दूतावासात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना केली.

भारत आणि अमेरिका यांच्यात ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार

भारताच्या दौर्‍यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्यात ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार झाला.

पाकिस्तानने त्याची भूमी आतंकवाद्यांना वापरण्यास देऊ नये !

भारत दौर्‍यात डोनाल्ड ट्रम्प यांची पाकला चेतावणी : पाकला शब्दांची भाषा कळत नाही, तर शस्त्रांचीच भाषा कळते. त्यामुळे ट्रम्प यांनी अशा कितीही चेतावण्या दिल्या, तरी पाकवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि भारतीयही यामुळे हुरळून जाणार नाहीत, हे तितकेच खरे !

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍याने भारताला लाभ होईल ! – तज्ञांचे मत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यावर १०० कोटी रुपये व्यय होणार आहेत, ते अनावश्यक आहेत, अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

ट्रम्प यांच्यासाठी बनवण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये त्यांच्या आवडत्या गोमांसाच्या पदार्थाचा समावेश नाही

केंद्र सरकारने केवळ ट्रम्प यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातच गोमांस आणि त्याच्यापासून बनवण्यात येणार्‍या पदार्थांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

अमेरिका आणि तालिबान यांच्यात १ आठवड्याची युद्धबंदी

अमेरिका आणि तालिबान यांच्यात अफगाणिस्तानमध्ये पुढील एक आठवडा युद्धबंदी करण्यावर सहमती झाली आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनकडून ही माहिती देण्यात आल्याचे वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले आहे.