राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

‘श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! १५.८.२०१९ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते.

गणेशोत्सवामध्ये बंधने घालू नका !

गणेशोत्सव हा लोकोत्सव आहे. त्याची ख्याती जगभरात पोेचवण्याचे काम गणेशोत्सव मंडळांनी केले आहे. त्यामुळे आमचे नियम, आमची आचारसंहिता आम्ही ठरवू. पोलीस-प्रशासनाने बंधने घालू नयेत, अशी भूमिका शहरातील गणेशोत्सव मंडळांनी घेतली.

बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर बळी देऊ नका ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मुसलमानांना आवाहन

१२ ऑगस्टला बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर प्राण्यांचा बळी देऊ नका, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना फिरंगी महाली यांनी केले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयीच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका ! – मुख्य निवडणूक अधिकारी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम्) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असल्याने त्याविषयी पसरवण्यात येणार्‍या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी १ ऑगस्ट या दिवशी केले.

‘प्राण्यांचा बळीच देऊ नये’, असे आवाहन कधी करणार ?

‘बकरी ईदला रस्त्यावर प्राण्यांचा बळी देऊ नका. ज्या प्राण्यांचे बळी देण्यावर बंदी आहे, त्यांचेही बळी देऊ नका’, असे आवाहन ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे सदस्य मौलाना फिरंगी महाली यांनी केले.

बकर्‍यांना क्रूरतेने मारू नका, शाकाहारी बना ! – बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर ‘पेटा’चे आवाहन

पेटा या प्राणीमित्र संघटनेने १२ ऑगस्ट या दिवशी असलेल्या ‘बकरी ईद’च्या पार्श्‍वभूमीवर राजस्थानच्या अलवर शहरातील एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे. यात लोकांना शाकाहारी बनण्याचे आवाहन केले असून ‘सरकारनेही अशा क्रूर हत्या होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे’, अशी मागणी केली आहे.

स्वतःचे मृत्यूपत्र (इच्छापत्र) सिद्ध करा आणि त्यामुळे होणारे लाभ लक्षात घेऊन संभाव्य अडचणी टाळा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

राज्यस्तरीय ‘श्री गणेश अथर्वशीर्ष पठण’ पाठांतर स्पर्धेचे स्तोत्रांजली बालसंस्कारच्या वतीने आयोजन

विरार, मुंबई येथील ‘स्तोत्रांजली बालसंस्कार’ या संस्थेच्या वतीने २ सप्टेंबरला असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय ‘श्री गणेश अथर्वशीर्ष पठण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा संपूर्ण राज्यात विविध शाळांमध्ये राबवली जाणार असून मान्यवर आणि अभ्यासू यांंचा यात समावेश आहे.

सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्या ८ दिवस बंद असणार

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामे यांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट या काळात वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस या दोन्ही गाड्या ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF