यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात आपल्या भागातील फटाके वाजवण्याचे प्रमाण वाढले, तेवढेच अथवा अल्प झाले असल्यास त्याविषयी जवळच्या सनातन प्रभातच्या कार्यालयाला कळवा !

सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक आणि जागृत हिंदू यांना विनंती ! देश आर्थिक संकटात असतांना फटाके वाजवणे म्हणजे पैशांचा चुराडा करण्याचाच प्रकार होय. या पार्श्‍वभूमीवर ….. आपापल्या परिसरात फटाके वाजवण्याचे प्रमाण वाढले, तेवढेच अथवा अल्प झाले असल्यास त्याविषयीची माहिती जवळच्या सनातन प्रभातच्या कार्यालयात कळवा.

श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी मूर्ती आणि निर्माल्य हिसकावून घेणार्‍यांवर कारवाई व्हावी !

गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये दीड दिवसानंतर, तसेच गौरीविसर्जन, अनंत चतुर्दशी आदी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी काही स्वयंसेवक भाविकांच्या हातातून मूर्ती आणि निर्माल्य बलपूर्वक हिसकावून घेण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात.

कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री राष्ट्रीय हरित लवादाच्या निकालानुसार प्रदूषणकारी आणि अवैध ! – हिंदु जनजागृती समिती

गणेशभक्तांनो, शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन हे धर्मशास्त्रानुसार असून ते पर्यावरणपूरक आहे, हे जाणा !

‘इको फ्रेण्डली’ गणेशोत्सवाच्या नावाखाली मूर्तीकारांकडून प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तींचा प्रचार करून भाविकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न

पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचे सांगत काही मूर्तीकार कागदी लगद्यापासून बनवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तींचा प्रचार करत आहेत. कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या मूर्ती पर्यावरणपूरक (इको फ्रेण्डली) असल्याचा खोटा प्रचार करून भाविकांना संभ्रमित करण्यात येत आहे.

सामाजिक माध्यमांवर काश्मीरच्या सूत्रावर भारतद्वेषी पोस्ट प्रसारित झाल्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला कळवा ! – निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे आवाहन

कुठल्याही सामाजिक माध्यमावर एखादा गट, ‘पेज’, ‘हँडल’ किंवा ‘वॉल’ यांमध्ये काश्मीरच्या सूत्रावर भारतद्वेष पसरवणारी किंवा सैन्यदलाविषयी अपप्रचार करणारी पोस्ट प्रसारित झाल्याचे आढळल्यास त्याविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्आयएला) कळवा,

एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर व्यापार्‍यांचा २ ऑक्टोबरनंतर बहिष्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देतांना २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीपासून प्लास्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले होते.

संतांनी वापरलेल्या, तसेच तीर्थक्षेत्री असलेल्या दुर्मिळ वस्तूंचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी जतन करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संग्रहालयाच्या सेवांमध्ये सहभागी व्हा !

सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना प्राप्त झालेले ज्ञान आजवरच्या अनेक पिढ्यांनी विविध माध्यमांतून जपून ठेवले आहे. त्यामुळेच आज आपल्याला त्या ज्ञानाचा सर्वंकष लाभ होत आहे.

गणेशभक्तांनो, भावभक्ती आणि धर्मपालन यांना जीवनात प्रथम अन् प्रमुख स्थान हवे !

पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त हिंदूंना विनम्र आवाहन
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ऑगस्ट मासात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. . . अशा परिस्थितीत येथे गणेशभक्त आणि भाविक यांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत….

पूरग्रस्त बांधवांनो, वास्तूची आध्यात्मिक शुद्धीही करा !

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील महापूर आता ओसरला आहे. पूरामुळे वास्तूत निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे वास्तूत त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. त्याचा सूक्ष्मातून त्रासदायक परिणाम वास्तू आणि वास्तूत रहाणारे यांच्यावर होतो.

अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधातील युद्धामध्ये भारतासह अन्य देशांनी सहभागी व्हावे ! – डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

भारतातील आतंकवादाच्या विरोधात अमेरिकेने भारताला किती साहाय्य केले ? पाकला सातत्याने देण्यात येत असलेल्या आर्थिक आणि सैन्य साहाय्यातून पाक त्याचा वापर भारताच्या विरोधात करत असतांना अमेरिकेने त्याला का रोखले नाही ?


Multi Language |Offline reading | PDF