अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : २७ मे ते ८ जून २०१९

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत.

वाहनातील इंधनाच्या स्फोटांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील दक्षता घ्या !

‘सध्या उन्हाळा चालू झाला असल्याने तापमानात वृद्धी होत आहे. पुढील काळात हे तापमान आणखी वाढणार आहे. यामुळे वाहनातील इंधनाचा (पेट्रोल आणि डिझेल यांचा) स्फोट होऊ शकतो. वाहनाच्या इंधनाची टाकी पूर्णपणे भरल्याने पेट्रोलचा स्फोट झाल्याच्या काही दुर्घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘इंडियन ऑईल’ने दिलेल्या चेतावणीनुसार सर्वांनी पुढील दक्षता घ्यावी.

भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे ! – ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’चे आवाहन

चर्च संघटनांनी कधी काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी पक्ष यांच्या विरोधात असे आवाहन केलेेले नाही, याचाच अर्थ ते धर्माच्या नावानेच भाजप आघाडी सरकारला विरोध करत आहेत, हे स्पष्ट होते !

(म्हणे) ‘मुसलमानांनी संघटित होऊन मतदान केल्यास मोदी यांचा पराभव होईल !’ – काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचे धर्माच्या आधारे आवाहन

प्रत्येक तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष मुसलमानांना मतांसाठी आवाहन करत आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे, हे लक्षात घ्या ! इतर वेळी निधर्मीवादाची टिमकी वाजवणारी काँग्रेस किती धर्मांध आहे, हे यावरून स्पष्ट होते.

संगठित होकर मतदान करेंगे तो मोदीजी की पराजय होगी ! – कांग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू की मुसलमानों से अपील

धर्मनिरपेक्ष कांंग्रेस की धर्मांधता !

काँग्रेसकडून निवडणुकीच्या काळात होणारे मुसलमानांचे लांगूलचालन जाणा!

मुसलमान बंधूंनो, जर तुम्ही संघटित झालात आणि मतदान केले, तर मोदी यांचा पराभव होईल’, असे आवाहन पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी केले.

सनातनच्या आश्रमात भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि ‘लॅपटॉप बॅग’ यांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांची संख्या अपुरी पडत असून पुढील क्षमतेचे भ्रमणसंगणक आणि ‘लॅपटॉप बॅग’ यांची आवश्यकता आहे.

(म्हणे) ‘आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मते द्या !’

चर्च संघटनेकडून तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ख्रिस्ती मतदारांना आवाहन : अशा प्रकारे जाती आणि धर्म यांच्यासाठी संकुचित विचाराने मत देण्याचे राज्यघटनेविरोधी आवाहन करणार्‍या चर्च संघटनेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंच्या संघटनांनी तक्रार केली पाहिजे !

‘चौकीदारा’प्रमाणेच नावापुढे ‘मुजाहिद’ शब्द (धर्मयोद्धा) लावा ! 

श्रीनगरचे उपमहापौर शेख इमरान यांचे त्यांच्या समर्थकांना आवाहन : कुठे मुसलमान नेते थेट धर्माच्या आधारे समर्थकांना आवाहन करतात, तर कुठे भाजप ‘चौकीदार’ शब्दाद्वारे धर्मनिरपेक्षता दाखवण्याचा प्रयत्न करतो !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now