आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी धर्मप्रेमींनी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने सध्या आपत्काळ चालू आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे वाढते बळ, राजकीय अस्थिरता, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात वाढत असलेल्या अडचणी ही सर्व आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत.

२४.१२.२०२० या दिवशी आरंभ झालेल्या ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखले’ची ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वैशिष्ट्ये

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी मार्गदर्शनपर भाववृद्धी सत्संग अश्‍विनी नक्षत्रावर आरंभ होणे, म्हणजे या आपत्काळात भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरुकृपेने मिळणारी संजीवनीच आहे.

आपत्काळाच्या सिद्धतेसाठी नवीन अथवा जुनी बैलगाडी, घोडागाडी किंवा त्यांचे विविध भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात कुणी देऊ शकत असल्यास त्याविषयी माहिती पाठवा !

आपत्काळात इंधनांचा तुटवडा भासेल. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्यांकडे नेणे, सामान आणणे इ. कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागेल.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी तत्परतेने साहाय्य करणार्‍या धार्मिक संस्था !

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला.

मूलभूत सुविधांचा फार्स !

जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !

आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्‍नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत होतो आज अंतिम भाग तिसरा पाहूया . . .

पितृपक्षातील काळात श्रीदत्ताच्या विशिष्ट नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

श्रीदत्ताचे नामजप ऐकल्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

आपण ज्या घरात इतकी वर्षे राहिलो, त्या घरातील वास्तुदेवतेप्रती आपण कृतज्ञ असले पाहिजे; कारण तिने आपल्याला इतकी वर्षे सांभाळले आहे आणि आपले रक्षण केले आहे. तिचे ऋण आपल्यावर आहेत.

आपल्या वास्तू आणि जागा यांची विक्री करण्याची प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करून संभाव्य आर्थिक हानी टाळा !

साधकहो, स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार तत्परतेने पूर्ण करून आपत्काळासाठी लवकरात लवकर सिद्ध व्हा !