शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

देहलीतील आजच्या ट्रॅक्टर मोर्च्यात गोंधळ घालण्यासाठी ३०८ पाकिस्तानी ट्विटर खाती कार्यरत ! – देहली पोलिसांचा दावा

उद्या २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यावर नियंत्रण ठेवून गोंधळ घालण्यासाठी पाकमधील ३०८ ट्विटर खाती कार्यरत असल्याची माहिती देहली पोलिसांना मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ब्रिटीश ‘स्नायपर’च्या ९०० मीटरवरून झाडलेल्या एका गोळीद्वारे इस्लामिक स्टेटचे ५ आतंकवादी ठार !

जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.

मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून हवालामार्गे आतंकवाद्यांना पैसा पुरवला जातो

मुंबईत अमली पदार्थांची विक्री होवून आतंकवाद्यांना पैसा जात असेल, तर पोलिसांनी हे लक्षात का आले नाही ? ही पोलिसांची निष्क्रियता नव्हे का ?

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

खलिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या ‘खालसा एड’ या संघटनेला शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस !

भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.

शेतकरी आंदोलनातील नेते बलदेव सिंह सिरसा यांची एन्.आय.ए.कडून चौकशी होणार

एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.  

आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये ! – सैन्यदलप्रमुख नरवणे यांची चीनला चेतावणी

भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्‍न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !

(म्हणे) ‘नथुराम गोडसे देशातील पहिला आतंकवादी आहे ! – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

कुणाला आतंकवादी म्हणावे, हेही न कळलेले काँग्रेसी ! जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला आदराने ‘ओसामाजी’ म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांनी असे विधान करण्यात नवल ते काय ?

वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा

प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !