पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित !

संसदेच्या पहिल्याच दिवशी गदारोळ घालणार्‍यांना अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले पाहिजे म्हणजे संसदेचे कामकाज शांतपणे चालू राहील !

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याविषयी ‘टास्क फोर्स’ समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर !

पहिल्या टप्प्यात उपाहारगृहे उघडण्यासाठी सवलती घोषित केल्या जाणार आहेत. उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केली जाणार आहे, तर ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते.

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

ब्रह्मांडांमधील अन्य ग्रहांवरही जीव ! – नासाचे प्रमुख बिल नेल्सन

हिंदु धर्मशास्त्रानुसार अनंत कोटी ब्रह्मांड असून तेथे पृथ्वीसारखी जीवसृष्टी आहे. याची माहिती उच्चकोटीच्या संतांना आहे. ते अशा जीवसृष्टी असणार्‍या ग्रहांवर सूक्ष्मदेहाने जाऊनही येतात. याची विविध उदाहरणे धर्मग्रंथात उपलब्ध आहेत.

उरावडे (पुणे) येथील अग्नीतांडव प्रकरणी आस्थापनाचे मालक आणि सरकारी अधिकारीच दोषी असल्याचा कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीचा अहवाल

उरावडे येथील एस्.व्ही.एस्. अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजीज कंपनी मधील ७ जून या दिवशी लागलेल्या आगीसाठी आस्थापनाचे मालक आणि सुरक्षेच्या पडताळणीचे दायित्व असलेले अधिकारीच दोषी असल्याचा अहवाल सादर केला आहे.

देशात भगवान शिव, श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्यावर हिंदूंची अधिक श्रद्धा ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्‍न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात आला होता.

भारतात हिंदूंचे सर्वाधिक धर्मांतर ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !

कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्चच्या शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी पोप यांनी क्षमा मागावी !

‘सेंट झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी, अशी मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते.

देहलीतील आप सरकारने आवश्यकतेपेक्षा ऑक्सिजनची चौपट मागणी केली ! – सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल

सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे आणि जर कुणी दोषी आढळले, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे !

रेल्वेतून प्रवास करतांना ‘कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र’ दाखवण्याचा नियम होण्याची शक्यता !

रेल्वेतून प्रवास करणार्‍या नागरिकांना आता ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीचा अहवाल दाखवण्याऐवजी ‘कोरोना प्रतिबंधात्मक लस’ घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचा नियम करण्याचा रेल्वेकडून विचार चालू आहे.