भूक शमवण्यासाठी !

जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. ‘दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही’, असे म्हणून भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे.

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारत १०१ व्या स्थानी

भारत ‘जागतिक भूक निर्देशांक (ग्लोबल हंगर इंडेक्स) २०२१’ मध्ये ११६  देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत ९४ व्या क्रमांकावर होता, म्हणजे एका वर्षांत तो ७ स्थानांनी घसरला आहे. आता तो पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याही मागे आहे.

आरोपींवर काय कारवाई केली, याविषयीचा अहवाल सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला आदेश

लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपींवर काही कारवाई झाली आहे कि नाही याविषयीचा अहवाल सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला दिला आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्सच्या कॅथॉलिक चर्चमध्ये वर्ष १९५० पासून लहान मुलांचे शोषण करणारे पाद्य्रांसह सहस्रो लोक होते ! – चौकशी आयोगाचा अहवाल

विदेशामध्ये पाद्य्रांच्या वासनांधतेची आणि समलैंगिकतेची शेकडो प्रकरणे समोर आली असल्याने ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशीच प्रतिमा ख्रिस्त्यांच्या मनात निर्माण होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

देशातील केवळ १०१ सरकारी रुग्णालयांत सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर कार्यरत !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आरोग्य व्यवस्थेची स्थिती पालटू न शकणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. जनतेला आरोग्य व्यवस्थाही नीट पुरवू न शकणारे शासनकर्ते हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

नेपाळला लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ !

गेल्या अनेक वर्षांपासून भारताची पुन्हा एक फाळणी करण्याचा सुनियोजित प्रयत्न चालू आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींकडून बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची बाजू घेऊन लोकसंख्या नियंत्रण विधेयकालाही विरोध करण्यात आला होता, हे जाणा !

पाकिस्तानमध्ये १२ जिहादी आतंकवादी संघटनांना आश्रय

अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !

बांगलादेशी घुसखोरांचे आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण !

एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढत चालली आहे लोकसंख्या

धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र असून त्या माध्यमातून निकटच्या भविष्यात त्यांचा हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करण्याचा कट असू शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही ! असे होऊ नये, यासाठी हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

महंत नरेंद्र गिरि यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या ५ डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतरच्या अहवालानुसार, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. त्यांच्या गळ्याला गळफासाचे निशाण आणि ‘व्ही’ आकार प्राप्त झाला आहे.