नेपाळ बनला जिहादी आतंकवाद्यांचा नवीन अड्डा ! – अमेरिकेचा अहवाल

पाकिस्तानमध्ये ज्या आतंकवादी संघटनांनी आक्रमणे केली, त्यांच्यावरच पाकने कारवाई केली आहे; परंतु ज्या आतंकवादी संघटनांनी भारतात आतंकवादी कारवाया केल्या, आक्रमणे केली, त्यांच्यावर पाककडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ यांचा विस्तार रोखण्यात पाक अयशस्वी ! – अमेरिकेचा अहवाल

पाकिस्तानचा जिहादी चेहरा आता पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. आतंकवादाचे पोषण करणार्‍या पाकवर जागतिक स्तरावर बहिष्कार घालणे आवश्यक आहे. यासाठी भारतानेच पुढाकार घेऊन आर्थिक, सामाजिक, सामरिक आदी स्तरांवर पाकची कोंडी करून त्याचा खोटारडेपणा अन् कावेबाजपणा जगासमोर आणायला हवा !