पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया धोकादायक संघटना ! – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.

आफ्रिकेत चीनच्या आर्थिक व्यवस्थेला धोका आणि भारताला असलेली नामी संधी !

१. चीनने आफ्रिकेतील देशांना कर्ज देऊन त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करणे आणि प्रचंड कर्जाच्या दबावाखाली ते देश त्रस्त होणे ‘आफ्रिकेत चीनची काही आस्थापने काम करत आहेत. आफ्रिकेतील नागरिकांना चिनी कारखाने आणि त्यांचे कर्मचारी यांच्याविषयी पुष्कळ राग आहे. तसेच तेथे काम करणारे चिनी नागरिक स्थानिकांशी अतिशय उद्धटपणे वागत असल्याने त्यांच्यावर आफ्रिकी लोकांचा रोष आहे. त्यामुळे या आस्थापनात … Read more

फुटीरतावादी यासिन मलिक, शब्बीर शाह आदींवर गुन्हा नोंदवा ! –  न्यायालयाचा आदेश  

या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना आता कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार असतील, तर ‘या प्रकरणांचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि शिक्षा कधी होईल ?’, हा प्रश्‍नच आहे !

कररचनेमध्ये कोणताही पालट नसणारा अर्थसंकल्प !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत वर्ष २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. भारतीय सर्वसामान्य जनतेला यावर्षी कररचनेमध्ये पालट होण्याची अपेक्षा होती; मात्र त्यात निराशाच पदरी पडल्याचे या अर्थसंकल्पात दिसून आले.

पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे होण्याची शक्यता !

राज्याचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे २८ फेबु्रवारी २०२२ या दिवशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री, आमदार यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी केली होती.

वर्ष २०१८ पासून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई नाही ! – केंद्र सरकार

केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या २ सहस्र रुपयांच्या केवळ १.७५ टक्के नोटाच चलनात आहेत.

गाय, गायीचे शेण आणि गोमूत्र यांमुळे अर्थव्यवस्था सक्षम करू शकतो ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह

एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते !

२१ बँकांमधील कोट्यवधी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळणार !

विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानशी व्यापार करतांना पाकिस्तानी चलनाचा वापर करणार ! – पाकिस्तान

याचाच अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न पाक करणार, असाच होतो ! पाकचा हा डाव जागतिक समुदाय कधी ओळखणार ?

आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि तंज्ञत्रान साहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न करणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतांना भारत आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि आक्रमणासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रे यांना आळा घालण्यासाठी काम करेल, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी सांगितले.