त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।

ज्यांचे पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे, ज्यांची प्रभा दिव्य आणि तेजस्वी आहे, ज्यांचे दैवी हास्य मनाचा ठाव घेते, ज्यांचा वात्सल्यमय कृपाकटाक्ष साधकांना आश्वस्त करतो, ज्यांच्या केवळ दर्शनानेही अनेक संकटांचे हरण होते, ते श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव साधकांचा प्राणच आहेत ! अशा श्रीविष्णुरूपातील गुरूंच्या तेजस्वी मुद्रांचे मनोहारी दर्शन डोळे भरून घेऊया !

दायित्व घेऊन सेवा करण्याविषयी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांना सुचलेले विचार !

‘मी ध्वनीचित्रीकरणाच्या संकलनाची सेवा करते. पूर्वी मला जेवढे शिकवले जायचे, तेवढेच मी करायचे. त्याच्या व्यतिरिक्त काही चुकल्यास मी म्हणायचे, ‘‘मी हा भाग शिकले नाही.’’ तेव्हा सहसाधकांनी मला समजावून सांगितले. त्यातून मला साधनेसाठी योग्य दिशा मिळाली आणि माझा उत्साह वाढला.

वयाच्या ९७ व्या वर्षीही एका जागी स्थिर बसून समष्टीसाठी नामजप करणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय १०० वर्षे) !

पू. आजोबा आरंभी ते समष्टीसाठी २ घंटे नामजप करत. नंतर काही वेळा त्यांना ६ घंटे नामजप करण्याची सेवा मिळायची. तेव्हाही ते आसंदीत बसून, स्थिर राहून आणि न कंटाळता नामजप पूर्ण करत असत.

दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यांवर नेणारे गुरूंचे निर्गुण रूपच !

‘हे गुरुदेवा, आम्हा सर्व साधकांना सनातन प्रभातच्या वाचकांना साधनेत जोडून ठेवता येऊ दे. हे दैनिक योग्य जिज्ञासूंपर्यंत पोचले जाऊन ते वर्गणीदार होऊ देत आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची पहाट होऊ दे’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना करते.

सौ. नीता मनोज सोलंकी यांच्या समवेत आणि त्या नसतांना गरबा नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी सौ. अवनी संदीप आळशी यांना जाणवलेली सूत्रे

वर्ष २०२० च्या नवरात्रोत्सवाच्या काळात सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे साधक यांनी गरबा नृत्य करणे अन् त्या नसतांना याच साधकांनी गरबा नृत्य करणे, असा एक प्रयोग संशोधनाच्या दृष्टीने घेण्यात आला होता.