कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पातून वगळली मागील भाजप सरकारची गोशाळा योजना !

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ७ जुलै या दिवशी विधानसभेत सादर केला. यात मागील भाजप सरकारने घोषित केलेल्या अनेक लोकप्रिय योजनांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. भाजप सरकारकडून गोमातांच्या रक्षणासाठी जिल्ह्यात एक गोशाळा उभारण्याचे ठरवण्यात आले होते, तसेच ‘विवेक सिरी (समृद्धी)’ या अंतर्गत सरकारी शाळांच्या अभिवृद्धीसाठी शाळेतील वर्ग वाढवण्याची योजना होती; मात्र या दोन्ही योजनांना काँग्रेस सरकारने तिलांजली दिली आहे.

‘विवेक सिरी’ योजनेच्या अंतर्गत राज्यातील सरकारी शाळांमधील ८०० वर्ग वाढवण्यात येणार होते. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या नावाने प्रस्तावित या योजनेच्या अंतर्गत राज्यातील २४ सहस्र शाळांना भगवा रंग देण्यात येणार होता. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसने यास विरोध केला होता. आता सत्तेत आल्यावर काँग्रेसने त्याला केराची टोपलीच दाखवली आहे.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !