सूक्ष्म ज्ञान

स्थूल पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. या
‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत, उदा.
भगवतो नारायणस्य साक्षान्महापुरुषस्य स्थविष्ठं रूपम् आत्ममायागुणमयम्
अनुवर्णितम् आदृतः पठति शृणोति श्रावयति स उपगेयं भगवतः परमात्मनः अग्राह्यम्
अपि श्रद्धाभकि्तविशुद्धबुदि्धः वेद । – श्रीमद्भागवत, स्कंध ५, अध्याय २६, सूत्र ३८
अर्थ : भगवंताचे उपनिषदांत वर्णन केलेले निर्गुण स्वरूप हे मन आणि बुद्धी यांच्या
पलीकडील आहे. असे असले, तरी जो त्याच्या स्थूल रूपाचे वर्णन वाचतो, ऐकतो
किंवा ऐकवतो, त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्ती यांमुळे शुद्ध होते आणि त्याला त्या
सूक्ष्म रूपाचेही ज्ञान होते वा अनुभूती येते.
साधना केल्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होत
असल्यामुळे त्यांनाही सूक्ष्म रूपाचे ज्ञान होते वा सूक्ष्माशी संबंधित अनुभूती येतात.
एकूणच धर्मग्रंथांत वर्णिलेल्या वचनांच्या सत्यतेची प्रचीती सनातनचे साधक घेत
आहेत. सनातनच्या विविध ग्रंथांत काही ठिकाणी ‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील संज्ञा वापरल्या आहेत. त्यांची स्पष्टीकरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंदि्रयांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या असि्तत्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
२. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंचसूक्ष्मज्ञानेंदि्रयांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
३. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
४. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रकि्रयेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
५. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.