Om Birla : केंद्रीय परिषदेसाठी कोट्यवधी रुपयांचा थाट; कामकाज केवळ साडेचार घंटे !

राष्ट्राच्या पैशाच्या अपव्यय रोखण्यासाठी काम करणारी मंडळीच पैशाचा अपव्यय करत असतील, तर हे काम कसे करणार ?  राष्ट्रीय

ठाणे जिल्ह्यातील ३५ गोशाळांना अधिकृत नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण !

गोशाळांनी केवळ जनावरांचे पालनच नव्हे, तर स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत – पशूसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे

मालेगाव येथील बनावट गोरक्षक, गोशाळा यांच्यावर कारवाई करावी !

बनावट गोरक्षक निर्माण करण्यापर्यंत धर्मांधांची मजल गेली असतांना राज्यात गोहत्या कशा थांबणार ?

गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सिडकोवर मोर्चा काढणार ! – शशिकांत शिंदे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, शरदचंद्र पवार गट

प्रकल्पग्रस्त आणि माथाडी कामगार यांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सिडको आणि महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे विधान शरदचंद्र पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी सानपाडा येथे केले.

नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन !

क्रेडाई एम्.सी.एच्.आय. युथकडून वाशीतील ‘सिडको एक्झिबिशन सेंटर’ येथे २९ जून या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत ‘मेगा पुनर्विकास प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात नवी मुंबई आणि रायगड या भागांत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण पुनर्विकास होणार आहे.

सांगली येथे धोकादायक इमारत महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने पाडली !

गावभाग आणि पाटील गल्ली येथील श्रेयस चौगुले यांच्या मालकीची धोकादायक इमारत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने २५ जून या दिवशी पाडली.

पुणे येथे २९ जूनला ‘इस्कॉन’कडून जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन !

ओडिशास्थित जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर ‘इस्कॉन’कडून (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाकडून) रथयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

२२ ते ३० सप्टेंबर राजगड तालुक्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू !

अतीवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर २२ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत प्रशासनाने येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत

हिंदु समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण !

बहुसंख्य हिंदूबहुल देशात अशा मागण्या कराव्यात लागतात आणि त्यासाठी आमरण उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे दुर्दैवी आहे !