सनातनचे साधक हरिप्रसाद पतंगे यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार प्रदान !

पुरस्काराविषयी सनातन संस्थेचे साधक श्री. हरिप्रसाद पतंगे यांचे समाजातून कौतुक झाले.

आषाढी वारी विशेष : १६ ते २० जूनपर्यंत पी.एम्.पी.एम्.एल्.च्या अधिकच्या बसगाड्या !

पंढरपूरमधील कायमच्या आणि तात्पुरत्या शौचालयांमधून १५६ ‘सक्शन अन् जेटिंग मशीन’च्या माध्यमातून मैला बाहेर घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय ठेवून कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत !

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी येथील सखल भागांत पाणी साचले आणि वृक्ष कोलमडून पडले. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यात पाऊस यांमुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-नाशिक महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

‘वनक्षेत्र’ म्हणून राखीव आरेच्या निसर्गरम्यक्षेत्राचा कचराभूमीप्रमाणे उपयोग !

वनक्षेत्र म्हणून राखीव असलेल्या आरे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू आणि कचरा टाकला जात आहे. येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.

अमेरिकेतील मराठीजनांकडून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘हृदयसम्राट’ पुरस्काराने सन्मान !

अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘हृदयसम्राट’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. स्वत: प्रशांत दामले यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवरून याविषयीची माहिती दिली.

राजकोट (मालवण) : शिवछत्रपतींच्या पुतळ्याला कोणताही धोका नाही !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी १६ जूनला येथील राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परिसराची पहाणी केली.

राज्यासह मुंबई-पुण्यात मोठा पाऊस !

यंदा लवकर चालू झालेला पाऊस थांबणार, असे अंदाज वर्तवले गेले; परंतु काही अल्प काळ सोडला, तर पाऊस थांबला नाहीच आणि २ दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे, तसेच वारेही मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, ठाणे, लातूर, नांदेड आणि कोकणात सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.

कार्कळ (कर्नाटक) : विवाहित हिंदु महिलेसह असलेला मुसलमान बसचालक पोलिसांच्या कह्यात !

हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे सिद्ध झाले, तरी काँग्रेसच्या राजवटीत धर्मांधांना शिक्षा होणे दुरापस्तच आहे !

धोकादायक साकवांचा वापर करू नका ! – पालकमंत्री नितेश राणे

जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात साकव बांधण्यात आले आहेत. काही साकव बांधून बरीच वर्षे झाली आहेत, तर काही साकव नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

निष्ठूर मुलाने आईवर कोयत्याने सपासप वार केले

ही घटना १५ जून या दिवशी दुपारी आगरवाडा, पेडणे येथे घडली. मांद्रे पोलिसांनी संशयित संजू याला कह्यात घेतले आहे. या घटनेमुळे या परिसरातील लोकांना हादरा बसला आहे.