रक्तदान करण्यासाठी १० रक्तदाते बांबाेळी, गोवा रुग्णालयात पोचले !

‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेच्या गटावर आला रक्तदानाचा संदेश

आनंदवाडीसह (सिंधुदुर्ग) अन्य मत्स्य बंदरांची विकासकामे तातडीने पूर्ण करा ! – नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

मुंबईतील ससून गोदी (डॉक); कारंजा (उरण), रायगड; आनंदवाडी, सिंधुदुर्ग आणि मिरकरवाडा, रत्नागिरी येथील मत्स्यबंदरे कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.

गोव्याच्या टॅक्सी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही ! – माविन गुदिन्हो

गोव्याच्या टॅक्सीक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गोव्यात ॲपवर आधारित टॅक्सीसेवा आली पाहिजे, असे ठाम मत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले आहे.

पुन्हा असा प्रकार कधी घडणार नाही ! – मुख्यमंत्री सावंत यांची डॉक्टरांना ग्वाही

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची मानहानी केल्यावरून राणे यांनी ‘एक्स’ या प्रसारमाध्यमावरून त्यांनी वापरलेल्या कठोर शब्दांविषयी डॉ. रुद्रेश यांची क्षमा मागितली आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) सायबर विभागाकडून १३५ संशयितांना अटक

गुंतवणूक, मनी लाँड्रिंग (पैसे देणे-घेण्याचा व्यवहार), ‘डिजीटल अरेस्ट’ची भीती घालून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोकजागृती होत असतांनाही असे गुन्हे घडत आहेत. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ९० टक्के गुन्ह्यांची उकल करत १३५ संशयित गुन्हेगारांना अटक केली आहे.

राज्यातील १ लाख ८ सहस्र शाळांमध्ये सैनिकी शिक्षणासाठी चाचपणी !

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच राज्यातील सर्व शाळांमध्ये सैनिकी शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यावर कार्यवाहीच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणार्‍या १ लाख ८ सहस्र शाळांमध्ये सैनिकी शिक्षणाविषयी चाचपणी चालू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अपघात विभागात येऊन क्षमा मागावी ! – डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची मागणी

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अपघात विभागाचे वैद्यकीय अधिकारी रुद्रेश कुट्टीकर यांनी ‘आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ज्या ठिकाणी माझी मानहानी केली, त्या अपघात विभागात येऊन सार्वजनिकरित्या माझी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

केंद्राची प्रत्येक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवत आहोत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

केंद्राची प्रत्येक योजना राज्य सरकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवत आहे. केंद्र सरकारच्या ८० टक्के योजना राबवण्याचे काम गोवा सरकारने केले आहे. यापुढेही केंद्र सरकारच्या सर्व योजना गोव्यात प्रभावीपणे राबवण्यात येतील, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

मिरज येथे मशिदीच्या भिंतीवर चढून नाचल्याप्रकरणी हिंदु-मुसलमान गटांत तणाव !

मिरज येथे मशिदीच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या प्रकरणी शहरात हिंदु-मुसलमान २ गटांत तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका हिंदूला कह्यात घेतले आहे, तसेच त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ४ घंट्यांनंतर हा तणाव निवळला.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ

भारतीय रेल्वेच्या गौरव यात्रेअंतर्गत ९ जूनपासून चालू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी प्रेरणादायी अनुभव असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.