पोलिसांच्या हाताला झटका देत फरार झालेला आरोपी कह्यात !

कल्याण तालुका पोलिसांच्या कह्यात असणारा बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील (पॉक्सो) आरोपी चैतन्य राजू शिंदे (वय २१ वर्षे) याने २ पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढला. गर्दीचा अपलाभ घेऊन तो रेल्वेस्थानकाच्या दिशेने पसार झाला होता.

येवला (नाशिक) येथे बकरी ईदच्या दिवशी गोवंशियांना नेणारा ट्रक गोरक्षकांनी पकडला !

कत्तलीच्या उद्देशाने गोवंशियांना नेणारा मालवाहू ट्रक गोरक्षकाच्या साहाय्याने पोलिसांनी पकडला आहे. यातील २० गोवंशियांची सुटका करण्यात आली आहे. ७ जून म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

सातारा जिल्हा रुग्णालयात ‘बी.एस्.सी. नर्सिंग’ अभ्यासक्रमाला मान्यता !

सातारा जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ‘जनरल नर्सिंग अँड मिड वायफर’ (जी.एन्.एम्.) या अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करून बी.एस्.सी. नर्सिंग हा ४ वर्षांचा अभ्यासक्रम चालू करण्यास केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे.

वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या अध्यक्षपदी शिरवळकर, तर प्रदेशाध्यक्षपदी उखळीकर महाराज यांची निवड !

वारकरी संप्रदायातील संतवाङ्मय तत्त्वज्ञानानुसार कार्यरत असणारी ‘वारकरी संप्रदाय पाईक संघ’ ही संस्था आहे. या संस्थेच्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीची नुकतीच निवड घोषित करण्यात आली.

वारकर्‍यांना योग्य सुविधा मिळाव्यात ! – डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख

‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा’ लोणंद मुक्कामी असतांना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. हे लक्षात घेऊन दर्शन रांगांची संख्या वाढवण्यासमवेत लोणंद-खंडाळा रस्त्यावर पादचारी उड्डाणपूल (स्कायवॉक) उभारण्यात यावा

उरूसाला अनुमती नसतांना मोठ्या संख्येने लोक विशाळगडावर उपस्थित

प्रशासनाने विशाळगडावर होणार्‍या उरूसाला बंदी घातलेली असतांनाही ८ जून या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक विशाळगडावर दर्ग्याला जाण्यासाठी उपस्थित होते. ‘एकीकडे प्रशासन जरी उरूसाला बंदी आहे, असे म्हणत असले, तरी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने ही बंदी नावालाच होती का ?’

शनिवारवाड्याला दिव्यतेचा अनुभव देण्याचा प्रयत्न करू ! – गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात पेशवे घराण्याचे मोठे योगदान आहे. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या इतिहासाचा मौल्यवान साक्षीदार आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांना, अभ्यासकांना पूर्ववैभवाचा, तसेच दिव्यतेचा अनुभव देता यावा

आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी २७ जूनपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी २७ जूनपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था करण्यात येत आहे

सातारा येथे होणार आगामी ९९ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ !

हा निर्णय ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’च्या ८ जून या दिवशी झालेल्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

तळोजा येथे सकल हिंदु समाजाकडून छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी !

सायंकाळी ‘शिव शंभू-विचारांची देवाण घेवाण व्हावी, हिंदूंनी संघटित व्हावे’, अशा स्वरूपाचा आशय व्याख्यानाद्वारे मांडण्यात आला.