वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर आघात करणारे इंद्रायणी तीरावरील पशूवधगृह रहित करा !

कोट्यवधी वारकर्‍यांच्या श्रद्धेवर आघात करणारा हा प्रस्ताव शासनाने तात्काळ आणि कायमस्वरूपी रहित करावा, अशा मागणीचे निवेदन ६ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयातील लिपिकांकडे दिले.

राजस्थान : अतीदक्षता विभागात उपचार घेणार्‍या महिलेवर गुंगीचे इंजेक्शन देऊन बलात्कार !

राजस्थानच्या एका रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असतांना एका ३२ वर्षांच्या महिलेवर गुंगीचे इंजेक्शन देऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना ४ जून या दिवशी घडली आहे.

पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील पालखीतळांची, रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची पालकमंत्र्यांकडून पहाणी !

चंद्रभागा नदीपात्राच्या कडेला असणारी काटेरी झाडे झुडपे, मातीचे आणि दगडाचे ढिगारे तात्काळ काढून घ्यावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिले २५ गोवंशियांना जीवनदान !

पशूवधासाठी नेत असलेल्या २५ गोवंशियांना वाचवण्यास श्रीरामपूर शहर पोलिसांना यश मिळाले. ५ लाख २५ सहस्र रुपयांचा गोवंश (बैल आणि गाय) आणि २ लाख रुपयांचा टेंपो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

विवाहानंतर ४ दिवसांत सासरच्या मंडळींनी ‘तू आमच्या घरात शोभत नाही’, असे म्हणून ३० वर्षीय विवाहितेला अवमानित करत छळ चालू केला.

विशाळगडावर बकर्‍याचा बळी देण्यावर बंदी !

विशाळगडावर उरूस, उत्सव, सणांच्या वेळी बकर्‍याचा बळी देण्यास कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सरकार यांच्याकडून बंदीचा निर्णय घेतल्याविषयी हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते यांच्याकडून शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे साखर आणि पेढे वाटून जल्लोष

सराफासह ४ जणांना पोलिसांनी केली अटक !

छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडाप्रकरणी नांदेड येथून सराफासह ४ जणांना पोलिसांनी अटक केली.

पाथर्डी येथील गोरक्षकाचे अपहरण करून धर्मांधांची मारहाण !

पाथर्डी येथील गोरक्षक आणि व्यापारी श्री. भारत देवीदास निफारे यांचे धर्मांधांनी अपहरण केले. त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. या प्रकरणी निफारे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘सी.एस्.आर्. फंड’ ग्रामीण विकासासाठी वापरण्याच्या निर्णयाला वर्ष २०२९ पर्यंत मुदतवाढ !

‘मिशन महाग्राम’ हा उपक्रम निश्चित करून त्या अंतर्गत वर्ष २०२२-२५ या कालावधीत राज्यातील १ सहस्र गावांचा विकास करण्याचे उद्दिष्ट राज्यशासनाने निश्चित केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले !

येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुर्गम भागात गट्टी टाकून बनवण्यात आलेला रस्ता अधिकार्‍यांनी वन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत नांगरणीचे ट्रॅक्टर लावून खोदून टाकला होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.