सोलापूर येथील पंकज सुतार यांनी लावला प्लास्टिक खाणार्‍या जिवाणूंचा शोध !

सोलापूर येथील पंकज सुतार यांनी प्लास्टिक खाणार्‍या जिवाणूंचा शोध  ४ वर्षे चिकटीने आणि जिद्दीने प्रयोग करून लावला आहे. जागतिक स्तरावर हे संशोधन पोचले असून त्यासाठी पेटंट नोंदवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. 

पुणे महापालिकेला करदात्यांनी दिलेले १० कोटी रुपयांचे धनादेश वटले नाहीत !

नागरिकांनी मालमत्ता कर भरणा करण्यासाठी धनादेश दिले. त्यांतील महापालिकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांतून १० कोटी १५ लाख रुपयांचे ७८० धनादेश वटले नाहीत. अधिकोष खात्यावर पैसे नसतांनाही धनादेश दिले आहेत.

बागपत (उत्तरप्रदेश) : बकरी ईदला धार्मिक ठिकाणी बळी देणे स्वीकारले जाणार नाही !

येथे माता मानसा देवीचे प्राचीन मंदिर आहे आणि जैन समाजातील तीर्थंकर मंदिरही आहे. अशा धार्मिक ठिकाणांजवळ बकरी ईदची कुर्बानी कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते आकाश त्यागी यांनी दिली आहे.

आळंदीच्या सिद्धबेट परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच !

सिद्धबेटसारख्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाचा अयोग्य वापर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून येथे कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविक करत आहेत.

महाराष्ट्रातील मोठा ‘मैत्रेय ग्रुप घोटाळा’!

‘मैत्रेय प्लांट्स अँड स्ट्रक्चर्स प्रा.लि.’ आणि ‘मैत्रेय सुपरस्ट्रक्चर्स प्रा.लि.’ या आस्थापनांनी महाराष्ट्रातील एकूण २९ लाख ८७ सहस्र ४२२ गुंतवणूकदारांची २ सहस्र ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी मुसलमानांनी ‘इको फ्रेंडली’ बकरी ईद साजरी करावी ! – नितेश राणे, बंदरे विकास मंत्री 

पर्यावरणरक्षणासाठी हिंदु समाज ‘इको फ्रेंडली’ होळी, ‘इको फ्रेंडली’ दिवाळी, ‘फटाकेमुक्त’ दिवाळी साजरी करतो. मग मुसलमान समाजानेही महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, तर ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) बकरी ईद साजरी करावी – बंदरे विकास मंत्री नितेश राणे

वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी जामिनासाठी ५५० कोटी रुपयांची खंडणी मागितली !

गायकवाड यांचे अधिकोषातील सुरक्षा खाते (बँक लॉकर्स), सोने आणि रोख रक्कम जप्त करतांना सुपेकर आणि तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १०० ते १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा….

शनीशिंगणापूर येथील देवस्थानामध्ये ‘ऑनलाईन पूजा अ‍ॅप’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा !

मागील महिन्यात सामाजिक माध्यमावर अनधिकृत भ्रमणभाष ‘अ‍ॅप’द्वारे अनुमाने ४० ते ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

आळंदीजवळील प्रस्तावित पशूवधगृह त्वरित रहित करा !

आळंदीजवळील प्रस्तावित पशूवधगृह त्वरित रहित करावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नावे देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील ‘वीरशैव लिंगायत समाजा’च्या बहुउद्देशीय सभागृहाच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित रहाण्यासाठी मंत्री नितेश राणे आले होते.

आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृहाच्या आरक्षणाविरोधात जनतेने ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केलेली मते !

विश्वविख्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर हे वैष्णवांचे श्रद्धास्थान आहे. या परिसराजवळ पशूवधगृह उभारण्यात येऊ नये.