नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानाचा अपमान करणारा उरूस भरल्यास उधळून लावणार ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानाचा अपमान करणारा उरुस भरवायचा प्रयत्न विशाळगडावर झाल्यास महाराष्ट्रातील शिवभक्त तो उधळून लावतील, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी दिली.

हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्या आतंकवादी संघटनांना पैसे दिल्यास होणार कारवाई !

पाकव्याप्त काश्मीर सरकारने ६६ आतंकवादी  संघटनांची सूची जारी केली आहे. यामध्ये हाफिज सईदच्या लष्कर-ए-तैयबा आणि मसूद अझहरच्या जैश-ए-महंमद या संघटनांचाही समावेश आहे. या आतंकवादी संघटनांना बकरी ईदनिमित्त पैसे किंवा प्राणी दिल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सरकारने दिली आहे.

आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाची विशेष बससेवा !

यंदा आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या, पुणे विभागाच्या वतीने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. एका गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या गावातून पंढरपूरपर्यंत गाडीची व्यवस्था केली जाणार आहे.

१० स्वॅप किडनी प्रत्यारोपण पार पडल्याप्रकरणी पुणे येथील डॉ. तावरे यांना अटक !

डॉ. अजय तावरे यांचे नाव गुन्ह्यातून वगळणे हे गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. स्वॅप किडनी रॅकेटप्रकरणी आर्थिक देवाणघेवाण स्पष्ट झाल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई करण्यास विलंब का झाला ? याची पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

अनधिकृत विद्युत जोडणीमुळे शाळकरी मुलीचा मृत्यू !

प्रसिद्धी फलकासाठी अनधिकृत वीजजोडणी होत असेल, तर हे गंभीर आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून केले, हे समजले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उभारलेल्या ३४ जलस्रोतांचे संवर्धन होणार !

जलस्रोतांचे राज्यशासन संवर्धन करण्यासाठी राज्यशासनाने ७५ कोटी रुपये इतका निधी संमत केला

श्रीनगरमध्ये शीख यात्रेकरूंच्या ताफ्यावर तलवारीने आक्रमण !

श्रीनगर शहरात नुकतेच शीख यात्रेकरूंच्या ताफ्यावर अचानक तलवारीने आक्रमण करण्यात आले. शीख भाविकांचा ताफा शहरातील एका भागातून जात असतांना ही घटना घडली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा पत्राद्वारे गौरव !

ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान राष्ट्रहितासाठी केलेल्या योगदानाविषयी भारतीय लष्करातील ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा विनोद तावडे यांनी पत्राद्वारे गौरव केला

स्वतंत्र आणि उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

धनदा कॉर्पोरेशन लििमटेड आणि उपाहारगृह व्हिट्स लिलाव प्रकरण

पाकिस्तानात अहमदिया मुसलमानांना ईद साजरी करण्यास बंदी !

पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतांतील अहमदिया मुसलमानांना ईद साजरी करण्यापासून रोखण्यासाठी शपथपत्रे भरण्यास भाग पाडले जात आहे. पंजाबमध्ये अहमदिया मुसलमानांना चेतावणी देण्यात आली आहे की, जर त्यांनी ईद साजरी केली, तर त्यांना ५ लाख रुपये दंड भरावा लागेल.