ब्रह्माकरमळी (सत्तरी), गोवा येथील श्री ब्रह्मदेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

चोरट्याला ४८ घंट्यांच्या आत कह्यात घेण्याची मंदिर समिती आणि स्थानिक यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ गावांना पुराचा धोका

पावसाळ्याच्या कालावधीत अतीवृष्टी झाल्यास पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी धोका निर्माण होणार्‍या जिल्ह्यातील गावांची सूची प्रशासनाने घोषित केली असून त्यात ४५ गावांचा समावेश आहे. अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे

फर्मागुडी येथील शिवरायांच्या डिजिटल संग्रहालयासह २ प्रकल्पांना राज्य मंत्रीमंडळाची संमती

गोवा राज्य मंत्रीमंडळाने फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याजवळ ६४ कोटी रुपये खर्चून संग्रहालयाची उभारणी, पर्वरी येथे ११० कोटी रुपये खर्चून ‘टाऊन स्क्वेअर’ची उभारणी आणि २२ कोटी रुपये खर्चून पर्वरी येथील खाडीचा विकास करणे या एकूण ३ प्रकल्पांना संमती दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ब्रिटिशांनी परत घेतलेली ‘बॅरिस्टर’ पदवी पुन्हा मिळवू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘बीए’ आणि ‘बॅरिस्टर’ या पदव्या ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या. त्यांपैकी ‘बीए’ पदवी मुंबई विद्यापिठाने परत केली होती. त्यांची ‘बॅरिस्टर’ ही पदवी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ ही पदवी देऊ, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

धायरी (पुणे) येथील मद्यविक्रीची दुकाने बंद व्हावीत, यासाठी श्री गणपतीला साकडे !

धायरी गावातील उंबर्‍या गणपति चौकातील मद्यविक्रीच्या २ दुकानांमुळे मद्यपींचा महिला आणि नागरिक यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आता ही दुकाने कायमची बंद करावीत, या मागणीसाठी नागरिकांनी १ जून या दिवशी ‘उंबर्‍या गणपती’ला साकडे घालत महाआरतीचे आयोजन केले आहे.

शासकीय कार्यालयांत मराठी भाषेचा वापर होतो कि नाही ?, हे पहाण्याचे दायित्व जिल्हाधिकार्‍यांचे !

राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करणे त्रिभाषिक सूत्रानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी भाषेचा वापर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये व्यवस्थित होत आहे कि नाही, हे पहाण्याचे दायित्व जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला ! – मंत्री गोविंद गावडे

मी मुख्यमंत्र्यांबद्दल काहीच वाकडे बोललेलो नाही. ते माझे चांगले मित्र आहेत; मात्र काही जणांना माझ्याबद्दल द्वेष आहे. प्रसारमाध्यमांनी अर्थाचा अनर्थ करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे स्पष्टीकरण कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी २८ मे या दिवशी दिले.

आतंकवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानचे अस्तित्व संपवणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

आतंकवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले. पणजी येथील धन्वंतरि प्रतिष्ठानकडून आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर : भारताची भूमिका आणि वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते.

मला धमकावून ठार मारण्याची धमकी दिली जाते ! – प्रिया फुके

भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांची भावजय प्रिया फुके यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘परिणय फुके यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देऊन मला धमकावले जात आहे.

पती, सासू आणि सासरे यांना न्यायालयीन कोठडी

सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे (वय २८ वर्षे) यांचा  शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी पती सागर, सासरे रामदास आणि सासू सौ. रोहिणी अनभवणे या ३ संशयित आरोपींना २७ मे या दिवशी देवगड न्यायालयाने ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.