मृत अर्भक आणि मानवी अवयव उकिरड्यावर टाकल्याच्या प्रकरणी भंगाळे रुग्णालयाची नोंदणी रहित !

दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावर जिजामातानगर येथे उकिरड्यावर प्लास्टिकच्या बरणीत १८ ते २० आठवडे वयाच्या अर्भकाचे मृत शरीर आणि अन्य बरण्यांत शस्त्रकर्मानंतर काढण्यात आलेले मानवी अवयव रुग्णाच्या नावासह आढळले.

कोरोनाचे महाराष्ट्रात २७८ रुग्ण !

कोरोना झालेल्या रुग्णांची सद्यस्थिती पहाता नाशिक महापालिका ५ सहस्र अँटीजेन किटची खरेदी करणार

महापालिकेकडे जमा झालेल्या रकमेपैकी ७०० कोटी रुपयांची ‘मुदत ठेव’ ठेवण्याचा निर्णय !

महापालिकेला मिळणारे उत्पन्न, ठेकेदाराकडून मिळालेली अनामत रक्कम, ‘बँक गॅरंटी’ अशा कारणाने महापालिकेच्या बँक खात्यामध्ये मोठी रक्कम जमा झाली आहे. त्यापैकी ७०० कोटी रुपयांची मुदतठेव ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील अमोल खोतकर चकमक प्रकरणाला नवे वळण !

वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये ही चकमक झाली होती. पोलीस दरोडेखोरांच्या मागावर होते. यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांनाच मारण्याचा प्रयत्न केला होता.

बीड पोलीस ठाण्यात भैय्या पाटील विरुद्ध गुन्हा नोंद !

समाजात जातीद्वेषमूलक लिखाण करून तेढ निर्माण करणार्‍या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे.

आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर !

नदीकाठच्या रस्त्यांवर धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिला आयोगाने मयुरी हगवणेची तक्रार गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती ! – ज्योती मेटे, अध्यक्षा, शिवसंग्राम

मयुरी हगवणे हिची तक्रार महिला आयोगाने गांभीर्याने घेतली असती, तर वैष्णवीचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असती. महाराष्ट्रात चांगले कायदे आहेत; परंतु त्यांची कायद्यांची कार्यवाही करणारी यंत्रणा तटस्थ आणि निष्पक्ष असणे आवश्यक आहे.

४ ते २१ जून या कालावधीत प्रतिदिन शाळेत अर्धा घंटा योगासने शिकवली जाणार

राज्यभरात ३० सहस्र ठिकाणांवर योगासन प्रशिक्षणवर्ग घेण्याचे सरकारचे लक्ष्य

१ कोटी रुपये न दिल्यास ठार मारणार !

नवी मुंबईतील सीवूड्स येथे रहाणार्‍या एकाला भ्रमणभाषवर संदेश पाठवत १ कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे. १ कोटी रुपये न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची बैठक हा केवळ देखावा ! – वैभव नाईक, माजी आमदार, शिवसेना (ठाकरे गट)

पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली; मात्र गेल्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या हानीचे काय झाले ? संबंधितांना अद्याप हानीभरपाई मिळालेली नाही.