Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : जिंकलो, तरच जगू शकू ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

सनातन धर्माची परंपरा वैज्ञानिक आहे. विश्वात सनातन विचारच संपूर्णतः वैज्ञानिक विचार आहेत, यावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. जी व्यक्ती, समाज, निसर्ग आणि परमात्मा यांचे संतुलन करते, तो सनातन धर्म आहे.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन संस्थेच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे.

१ सहस्र वर्षांपूर्वीचे सोमनाथाचे शिवलिंगाचे घेतले भावपूर्ण दर्शन !

कार्यक्रमाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. दर्शक हाथी हे उपस्थित होते. या वेळी त्यांच्या समवेत सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीचे मूळ शिवलिंग उपस्थित संत आणि वक्ते यांना दाखवण्यासाठी व्यासपिठावर आणले होते.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातनच्या साधकांचे धर्मरक्षणाचे कार्य रणभूमीतील योद्धयाप्रमाणे ! – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

भारताला सनातन राष्ट्र करण्याची सनातनच्या साधकांनी भीष्मप्रतिज्ञा केली आहे, ती समस्त हिंदूंना ऊर्जा देत आहे. सनातन संस्थेचे हे कार्य समस्त देशवासियांमध्ये राष्ट्रनिष्ठा निर्माण करत आहे.

संतांच्या चैतन्यमय पादुकांचे गोमंतकभूमीत शुभागमन !

गुरुकृपेने असाध्य असे काहीच नाही ! हिंदूंवरील आघात नष्ट करण्यासाठी ‘सनातन राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ओळखले आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून व्यापक हिंदूसंघटन उभे केले.

शंखनादारंभ !

फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जनजागृतीसाठी १६ मे या दिवशी एक ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी काढण्यात आली.

देवतांच्या संदर्भातील कथा त्यातून शिकण्याच्या उद्देशाने वाचा !

‘देवतांच्या संदर्भातील कथांमध्ये त्यांनी असुरांबरोबर केलेले युद्ध, त्यांचे अन्य देवता आणि भक्त यांच्याबरोबरचे संवाद, अन्य देवतांशी झालेला ज्ञानाच्या स्तरावरील विचारविनिमय, यांसारखे प्रसंग असतात. या सर्व प्रसंगांमधून शौर्य, पराक्रम, ज्ञान, भक्ती, नीती यांसारखे अनेक पैलू शिकायला मिळतात. हे सर्व शिकण्याच्या उद्देशाने देवतांच्या कथा वाचल्या, तर आपल्यात त्या देवतेबद्दल भाव जागृत होण्यास साहाय्य होऊ शकते.’

१८ मे या दिवशी घरोघरी घंटा आणि शंख नाद करा ! – प.पू. शरद जोशी यांचे समस्त हिंदूंना आवाहन !

१८ मे या दिवशी घंटानाद आणि शंखनाद करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अभिवादन करावे. मी हे आवाहन योगिराज गुळवणी महाराज स्थापित ‘वासुदेव निवास आश्रम, पुणे’ येथील प्रमुख विश्वस्त म्हणून करतो – प.पू. योगश्री शरदशास्त्री जोशी महाराज

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी श्री कानिफनाथांच्या पादुकांचे आगमन !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवास मढी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिराच्या नित्य पूजेमधील पादुकांचे प्रस्थान होऊन त्या महोत्सवासाठी येत आहेत – ह.भ.प. मिलिंद चवंडके, नाथ पंथाचे संशोधक तथा प्रवचनकार

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरद वैशंपायन यांना स्वप्नात प.पू. डॉक्टर एका दिव्य विमानात बसून आकाशमार्गे जातांना दिसणे

मकरसंक्रातीच्या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मला स्वप्नात दिसले, ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) रहात असलेल्या खोलीच्या बाहेर आकाशमार्गे एक गरुडमुख असलेले दिव्य विमान आले.