कृती दलाकडून कला अकादमीच्या दुरुस्तीकामाविषयीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
कृती दल समितीने कला अकादमीच्या दुरुस्तीकामाविषयीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला आहे. या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.