श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त प.पू. दास महाराज यांना स्फुरलेली शुभेच्छारूपी शब्दसुमने !
वैज्ञानिक युगात मानवजात तंत्रज्ञानाची भाषा बोलत आणि त्याप्रमाणे वागत असतांना आपण गुरूंच्या मनातील विचार जाणून भारत अन् भारताबाहेरील अमूल्य आध्यात्मिक ठेवा जोपासण्याचे महान कार्य हाती घेतले आणि त्याचा नित्य ध्यास घेऊन अध्यात्माचा अनमोल ठेवा आम्हा साधकांपर्यंत पोचवला. भारत देशातील अमूल्य असा दैवी ठेवा पाहून आम्ही कृतार्थ झालो.