आखाडा परिचय : आवाहन आखाडा
हिंदु धर्म तत्कालीन विविध विचारसरणींच्या अथवा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने झाकोळला जात होता, तसेच त्याच्या अनुयायांची दिशाभूल होत होती. भविष्यात हिंदु धर्मावर वाढत्या संकटांचा विचार करून आद्यशंकराचार्यांनी भारताच्या ४ दिशेला ४ पिठांची स्थापना केली. या पिठांच्या अंतर्गत जे साधू एकत्र येतील, त्यांना शास्त्रासह शस्त्र चालवण्याचेही ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे आखाड्यांची निर्मिती झाली.