दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बलात्काराच्या घटनांमध्ये मुंबई प्रथम !; २ युवतींचा अपघाती मृत्यू !; ….

राज्याची आर्थिक राजधानी बलात्कारांत पुढे असणे लाजिरवाणे !

अयोध्यानगर येथील श्री हनुमान महाआरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात १२ जानेवारीला रात्री ७ वाजता समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड येथे महापालिकेचे लाचखोर विद्युत् मूल्यमापक निरीक्षक निलंबित !

विकास गव्हाणे हे महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात मीटर निरीक्षक म्हणून काम करत होते. पाणीपट्टी देयक अल्प करण्यासाठी त्यांनी १ सहस्र ६०० रुपये लाचेची मागणी केली.

रत्नागिरी येथे विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाचे निलंबन !

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांचे केवळ निलंबन नव्हे, तर त्यांना कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे!

Stone Pelting At Tapti Ganga Express : महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या ताप्तीगंगा रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक !

केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंसह त्यांची वाहने, तसेच रेल्वे यांवर आक्रमणे केली जातात, हे लक्षात घ्या ! कुंभमेळ्याच्या यात्रेकरूंच्या संदर्भात अशी घटना घडणे चिंताजनक !

PM Modi Visit To Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र दौर्‍यावर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय.एन्.एस्. सुरत, आय.एन्.एस्. निलगिरी आणि आय.एन्.एस्. वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. दुपारी ३.३० वाजता त्यांच्या हस्ते खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

Los Angeles Wildfires : लॉस एंजेलिस आगीतील मृतांची संख्या २४ वर !  

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलातील आगीशी झुंजणार्‍या अमेरिकेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. १४५ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १४ सहस्र कर्मचारी, १ सहस्र ३५४ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ८४ विमाने प्रयत्न करत आहेत.

Varanasi Siddheshwar Mahadev Temple : वाराणसीमधील मुसलमानबहुल भागातील बंद असणारे २०० वर्षे जुने सिद्धेश्‍वर मंदिर प्रशासनाने उघडले !

त्यात अनेक शिवलिंगे सापडली आहेत. येत्या १५ जानेवारीनंतर या मंदिरात पूजेला प्रारंभ होणार आहे.

India Bangladesh Border Tension : दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांना समन्स बजावून जाब विचारला !

भारत-बांगलादेश सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कथित बांधकामाचे प्रकरण  

Indian Army Chief On Border Situation : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात ! – सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

या वेळी त्यांनी देशाच्या सर्व सीमेवरील सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी चीन आणि म्यानमार सीमा, तसेच मणीपूर येथील हिंसाचार संदर्भात माहिती दिली.