नाशिक येथे कृत्रिमरित्या आंबे पिकवणार्‍यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम !

अनैसर्गिकरित्या पिकलेले आंबे खाणे आरोग्यास चांगले नसते. कच्चे आंबे वाहतुकीच्या दृष्टीने पाठवणे योग्य असते. आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातो. 

उन्हाळ्याच्या प्रारंभीच सोलापूर येथील १९ गावांत टँकरने पाणीपुरवठा !

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रशासनाने प्रबोधन करणे आवश्यक !

डोंबिवली येथे अनधिकृत इमारतींना चोरून नळजोडणी देणारा अटकेत

चोरीच्या नळजोडण्या देत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. अनधिकृत इमारतीला पाणी देतांना त्याला रंगेहातच पकडण्यात आले. पथकाने जाधव याचे नळजोडणीचे सामान, अवजारे जप्त केली.

आपत्काळात ‘विष्णुलीला सत्संग’रूपी लाभली संजीवनी ।

श्वासोश्वासी नाम अन् कृतज्ञता राहू दे अंतर्मनी ।
अंतःकरणात व्यक्त होऊ दे कृतज्ञता गुरुचरणी ।। ४ ।।

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतर कायम रहाणार !

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

गोव्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करा ! – ‘वीर सावरकर युवा मंच, डिचोली’ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वीर सावरकर यांच्याविषयी योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविषयी विनाकारण निर्माण केल्या जाणार्‍या वादांना चाप बसेल. यासाठी सर्व सामान्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा आणि विद्यार्थ्यांना  विनामूल्य दाखवावा. असे निवेदनात म्हटले आहे

स्वभावदोषांच्या निवारणासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे

गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्‍या आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी अखंड धडपडणार्‍या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !

फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.

प्रीतीने सर्वांशी जवळीक साधणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

मला सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत तळेगाव येथे शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली असताना तेथील जिज्ञासू आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सद्गुरु स्वातीताईंच्या प्रती पुष्कळ आदर पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.