गोवा मांस प्रकल्पात २०० म्हशींची ‘कुर्बानी’

प्रतिदिन खाण्यासाठी आणि ईदनिमित्त कुर्बानीसाठी गुरे लागतात, तर मुसलमान गोठे उभारून गुरे का पाळत नाहीत ?

उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीचे यशस्वीपणे आयोजन !

अधिवेशनाच्या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथे असलेला सनातनचा चैतन्यमय आश्रम पाहिला. त्यांपैकी काही जणांनी अधिवेशन आणि सनातन आश्रम या संदर्भात स्वतःचे अनुभव कथन केले. यातील काही अनुभव १९.६.२०२४ या दिवशी पाहिले. आज पुढील अनुभव पाहू.

निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले हे हिंदूंचे खरे कैवारी आहेत ! – श्री. राजेंद्र परुळेकर, धर्मप्रेमी, विजयदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग.

प.पू. डॉ. आठवले यांनी माझे नाव लक्षात ठेवून मला प्रसाद पाठवला. केवढा हा प्रेमभाव ! त्यांचे हे निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे आज सहस्रो हिंदू त्यांच्याशी जोडले गेले आहेत अन् धर्मप्रसाराची सेवा ‘गुरुकार्य’ म्हणून निरपेक्ष भावनेने करत आहेत.

‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते’, या गुरुवचनानुसार ‘वैश्विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती !

वैश्विक हिंदु राष्‍ट्र महोत्सवात सहभागी होणारे धर्माभिमानी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता किंवा ‘कुणी या कार्याची नोंद घ्यावी’, अशी अपेक्षा न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत आहेत. त्यांना कुणी मार्गदर्शक नसूनही ते स्वयंप्रेरणेने हे कार्य करत आहेत.

धर्माचरणाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील कु. मनस्वी मुकेश काकडे (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मनस्वी काकडे ही या पिढीतील एक आहे !

पू. शिवाजी वटकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना आणि सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे. यातील काही सूत्रे १९ जून २०२४ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

‘कलेतून ईश्वरप्राप्ती’ कशी होते, याची झलक दर्शवणारे साधिकांनी ब्रह्मोत्सवादिवशी सादर केलेले नृत्य !

श्रीविष्णूस्वरूप गुरुदेव प्रत्यक्ष ते नृत्य पहात होते. त्यामुळे दशावतार सादर करतांना ‘त्या त्या अवताराच्या तत्त्वाचे तेथे प्रकटीकरण होत आहे’, असेच जाणवत होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शिरीन चाइना (वय ७२ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात शिव, हनुमान आणि श्री दुर्गादेवी या देवतांची चित्रे पहातांना जाणवलेली सूत्रे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या सनातन-निर्मित चित्रांकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग घेण्यात आला.

महाराष्ट्रातील भाजपची कार्यकारिणी कायम रहाणार ! – खासदार पियुष गोयल

महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक देहली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत पार पडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. महाराष्ट्रातील भाजपची कार्यकारिणी कायम रहाणार आहे.

जुलैपर्यंत ९० लाख ४८ सहस्र शेतकर्‍यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे.