माऊलींचे मानाचे अश्व आळंदीकडे मार्गस्थ !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीला जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत.

पिंपरी (पुणे) येथे महिला साहाय्यक फौजदाराला मारहाण !

कारवाई केली याचा राग म्हणून कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला साहाय्यक फौजदाराला मारहाण केली.

वटपौर्णिमेपूर्वीच ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके हटवा !

भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. स्वाती शिंदे यांची आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

बुद्धीप्रामाण्यवादी अर्थात्‌ धर्मद्रोही !

धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे.

गुरुपौर्णिमेला ३१ दिवस शिल्लक

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे. 

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे प्रातिनिधिक स्तरावर एक ‘स्मारक मंदिर’ उभारण्याचा सरकारचा विचार !  

पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

गोरक्षकांवरील आक्रमणे कधी थांबणार ?

नाशिक येथे बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणार्‍या २ गोरक्षकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.