बारामतीत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुटी !

भरपगारी सुटी मिळूनही बारामतीत मतदानाचा टक्का सर्वांत अल्प असणे, हे कशाचे निर्देशक आहे ?

मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून, तसेच दुपारी १२ नंतरही कडक उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.७१ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते.

PM Modi At Beed : काँग्रेस दलित, मागसवर्गीय यांचे आरक्षण काढून मुसलमानांना देऊ इच्छिते ! – पंतप्रधान मोदी

२६/ ११ च्या आक्रमणाविषयी काँग्रेसच्या नेत्याने धक्कादायक विधाने केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते; मात्र काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छित आहे.

इ.व्ही.एम्. हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणार्‍याला पुणे येथून अटक !

आरोपी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे इ.व्ही.एम्. आहेत, ते सर्व ‘हॅक’ करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना भ्रमणभाष केला.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बनावट कागदपत्रे दिल्यास गुन्हे नोंद होणार !

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रिकी, वास्तूकला, हॉटेल मॅनेजमेंट, औषध निर्माण शास्त्र, बीबीए, बी.एम्.एस्., बीसीए, एम्.बी.ए., एम्.सी.ए., एम्.टेक अशा विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते.

IFC Singapore And IndianNavy : दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या नौकांचा ताफा तैनात !

सध्या दक्षिण चीन समुद्रात भारत त्याचे स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून भारत फिलीपिन्स आदी देशांशी संबंध दृढ करत आहे. चीनला घेरण्यासाठी भारताने अधिक आक्रमक होणे, ही काळाची आवश्यकता आहे !

Muslims Reservation : मुसलमानांना ‘पूर्ण’ आरक्षण मिळालेच पाहिजे ! – लालू प्रसाद यादव

स्वत:च्या वक्तव्यांशीच निष्ठा न ठेवणारे राजकीय नेते कधीतरी देश आणि जनता यांच्याशी एकनिष्ठ राहू शकतील का ?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये लागलेल्या आगीमुळे तब्बल १६७ हेक्टर जंगल जळून भस्मसात !

आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू !

Children abused by Pakistan Army: पाक सैन्यदलातील अधिकार्‍यांकडून मुलांचे लैंगिक शोषण !

पाकिस्तानी सैन्यदलाच्या खैबर पख्तूनख्वाच्या आदिवासी भागात तैनात असलेल्या अधिकार्‍यांनी अनेक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी १०० मुलांचे ६०० हून अधिक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत.

(म्हणे) ‘जर प्रश्‍नपत्रिका बनवणारे उच्च जातीचे असल्याने दलित अयशस्वी होतात !’ – राहुल गांधी, काँग्रेस

प्रथम देशातील मुसलमानांना आणि आता अनुसूचित जातीतील हिंदूंना स्वत:च्या बाजूने वळवण्यासाठी राहुल गांधी यांनी चालवलेला प्रयत्न लांच्छनास्पद आहे. भारतियांनो, अशा काँग्रेसला आता कायमचे घरी बसवण्याचा प्रण घ्या !