नवरात्रोत्‍सव जवळ येऊनही येरमाळा (जिल्‍हा धाराशिव) बसस्‍थानकाची दुरुस्‍ती अपूर्ण !

स्‍थानकातील खड्ड्यांत पावसाचे पाणी साठले असल्‍याने प्रवाशांचे आरोग्‍य आणि सुरक्षितता यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत श्री येडेश्‍वरीदेवीच्‍या दर्शनाला संपूर्ण महाराष्‍ट्रातून लाखो भाविक येतात. या पार्श्‍वभूमीवर ‘लवकरात लवकर बसस्‍थानकाची दुरुस्‍ती करण्‍यात यावी’, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत !  – नितेश राणे, आमदार, भाजप

नवरात्रोत्‍सव आणि गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत. आयोजकांनी येणार्‍यांचे आधारकार्ड पडताळूनच त्‍यांना प्रवेश द्यावा.

‘तुळजापूर बंद’ला पुजारी आणि व्‍यापारी यांचा १०० टक्‍के प्रतिसाद !

मंदिर प्रशासनाने स्‍थानिक पुजारी आणि व्‍यापारी यांना विश्‍वासात घेऊन विकास आराखडा सिद्ध करणे अपेक्षित होते. घाडशीळ येथे दर्शन मंडप उभारणे भक्‍तांसाठी गैरसोयीचे होणार आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील भाविकांच्‍या सोयीसाठी फिरती स्‍वच्‍छतागृहे प्रदान !

साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्‍सव काळात भाविकांची संख्‍या वाढल्‍याने वाहनतळाच्‍या ठिकाणी स्‍वच्‍छतागृहांची आवश्‍यकता असते. हे लक्षात घेऊन ‘इंडोकाऊंट फाऊंडेशन’कडून महिला आणि पुरुष भाविक यांच्‍यासाठी स्‍वतंत्र ‘स्‍टेनलेस स्‍टील’मधील मोबाईल (फिरती) स्‍वच्‍छतागृहे देवस्‍थान समितीला सुपुर्द करण्‍यात आली.

पुण्‍यातील नामांकित शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेसह विद्यार्थ्‍यांवर गुन्‍हा नोंद

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यामध्‍ये मुख्‍याध्‍यापिका आणि विद्यार्थी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करावा लागणे, हे दुर्दैवी आहे.

हिंदु धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणार्‍या जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती  

सनातन धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणारे शहरी भागांतील उच्चशिक्षित, तसेच समाजसेवा, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रांत वावरणारे आणि पुरोगामित्वाचा बुरखा घालणारे ‘अर्बन नक्षलवादी’ आहेत.

सरकारने ‘हाफकीन’चे पैसे रखडवल्‍याने वर्षभरात सरकारकडून औषध खरेदी नाही !

सरकार १५० कोटी रुपये विज्ञापनासाठी व्‍यय करते; मात्र ‘औषध खरेदीसाठी पैसे देत नाही’, सरकार जनतेच्‍या जिवाशी खेळत असल्‍याचा अंबादास दानवेंचा आरोप !

राज्यातील ३५ ‘टॉप’ शाळांमध्ये रत्नागिरीतील २ शाळा

शालेय शिक्षण विभागाकडून ‘लेट्स चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे.