छत्रपती संभाजीनगर येथे धार्मिक स्थळांची विटंबना करणारी हिंदु महिला कह्यात !

येथील सातारा, पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा या ३ ठिकाणी २ धार्मिक स्थळांसह एका धार्मिक प्रतिमेची एका महिलेने विटंबना केली. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या साहाय्याने २ घंट्यांत तिला शोधून कह्यात घेतले. ती टपाल विभागात टपाल साहाय्यक म्हणून कार्यरत आहे.