भिंड (मध्‍यप्रदेश) येथील स्‍मशानभूमीतील मंदिरामधील घंटा आपोआप वाजू लागली ! 

भिंड शहरातील धर्मापुरी मुक्‍तिधाम स्‍मशानभूमीमध्‍ये महाकाल मंदिर आहे. या मंदिरात असलेली घंटा सायंकाळी अचानक आपोआप हलू आणि वाजू लागली. या घंटेचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले.

यंदाचा ‘पुलोत्सव’ हा ‘ग्लोबल पुलोत्सव’ म्हणून साजरा करणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

हा ‘पुलोत्सव’ ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये जगभर साजरा होणार असून देशातील २३ शहरांसह ५ खंडांतील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

मालदीवमध्‍ये इमारतीला लागलेल्‍या भीषण आगीत ९ भारतियांसह १० जणांचा मृत्‍यू

येथे एका इमारतीला लागलेल्‍या आगीत १० परदेशी कामगारांचा होरपळून मृत्‍यू झाला. इमारतीच्‍या तळमजल्‍यावर चारचाकी वाहनाच्‍या दुरुस्‍तीच्‍या ‘गॅरेज’मध्‍ये आग लागली होती.

गुरुग्राम येथे गोतस्‍करांच्‍या गाडीचा पाठलाग केल्‍याने त्‍यांनी चालत्‍या गाडीतून फेकल्‍या गायी !

गोतस्‍करांना आता फाशीचीच शिक्षा होण्‍यासाठी कायदा करणे आवश्‍यक !

हिंदुद्वेषी पाकिस्‍तानी पत्रकार शरीफ याचा हत्‍येपूर्वी छळ

हिंदुद्वेष पसरवण्‍यासाठी कुख्‍यात पाकिस्‍तानी पत्रकार अरशद शरीफ याच्‍या हत्‍येनंतर या प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे.

अफझलखानाचा अवैध दर्गा सरकारने पाडल्‍याविषयी सांगलीत शिवप्रेमींकडून साखर वाटप ! 

अफझलखानाचा अवैध दर्गा सरकारने पाडल्‍याविषयी सांगलीत शिवभक्‍तांकडून साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीसमोर फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली.

‘मिरज शासकीय दूध डेअरी’ची जागा ‘आयटी पार्क’साठी वापरण्‍याकरिता सर्वेक्षण होणार !

या संदर्भात ‘महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे स्‍वप्‍नील शहा म्‍हणाले, ‘‘शासनाच्‍या सध्‍याच्‍या धोरणानुसार दुग्‍ध व्‍यवसायात शासन सक्रीय होण्‍याऐवजी ही जागा ‘बिजनेस पार्क’ किंवा ‘आयटी पार्क’ साठी वापरण्‍यात यावी, असेच धोरण सध्‍या असणार आहे.

सातारा जिल्‍हा परिषदेने ‘शिवतीर्थ’ सातारा नगरपालिकेकडे हस्‍तांतरित करावे ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्‍हणाले की, ग्रेड सेपरेटरच्‍या कामातून उरलेल्‍या ८५ ते ९० लाख रुपयांतून काही जणांनी हट्टापोटी शिवतीर्थाचे काम हाती घेतले; मात्र ते तेवढ्या पैशांत होणार नाही, हे लक्षात आल्‍याने काम अर्धवट राहिले.

हिंदूंनी वेळीच संघटित होण्‍याची आवश्‍यकता ! – अभिनेते शरद पोंक्षे

अनेक देश बहुसंख्‍यांक नागरिकांच्‍या धर्माच्‍या आधारावर ओळखले जातात; मात्र हिंदुस्‍थानात हिंदु बहुसंख्‍यांक असूनही हा देश निधर्मी समजला जातो. हिंदुस्‍थानात छत्रपती शिवरायांच्‍या पराक्रमाचे देखावे दाखवण्‍यास विरोध होतो, हा कसला सेक्‍युलरवाद ?

मारेगाव (यवतमाळ) येथून अ‍ॅल्‍युमिनियमच्‍या २४ टन तारेची चोरी ! 

तालुक्‍यातील कानडा शेतशिवार चौकीतील २ चौकीदारांना ७ नोव्‍हेंबरच्‍या मध्‍यरात्री शस्‍त्राचा धाक दाखवून ८ ते १० जणांनी बांधून ठेवले आणि ३२ लाख रुपये किमतीची २४ टन अ‍ॅल्‍युमिनियमच्‍या तारेची चोरी केली.