‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना सातारा नगरपालिकेची नोटीस !

आगामी गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना नोटीस पाठवली आहे.

डोंबिवली येथे भोंदूबाबाकडून विकासकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक !

मानपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह ५ भामट्यांवर विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे ४ तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी चालू ! – विलास राठोड, विभाग नियंत्रक

यात्रेच्या कालावधीत महामंडळाचे १० ते ११ सहस्र कर्मचारी पंढरपूर येथे कार्यरत असणार ! अस्थायी स्थानके आणि तेथे येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील बसगाड्यांचे नियोजन

नगर येथील ‘अर्बन’ अधिकोषातील अपव्यवहारावर कारवाई नाही ! – अधिकोषाचे सभासद

एवढा मोठा घोटाळा होऊनही या प्रकरणी संबंधित प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे का ? प्रशासनाचे या घोटाळ्यातील संबंधितांशी लागेबांधे आहेत का ? हेसुद्धा पाहिले पाहिजे.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता !

भाजपने सरकार स्थापनेच्या विषयी कायदेशीर चाचपणी चालू केली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली.

डॉ. मुखर्जींच्या बलीदानामुळे काश्मीर आज भारतात ! – प्रकाश बिरजे, भाजप

आपल्या देशाच्या एका राज्यात भारतियांना प्रवेश करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेच्या कालावधीत डॉ. मुखर्जींचे निधन झाले. शामाप्रसादांच्या बलीदानामुळे काश्मीर भारतात राहिले.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे मनोरंजनासाठी विनाअनुमती पाळणे आणि झोपाळे यांची उभारणी !

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद (जिल्हा सातारा) येथील गोटे माळाजवळ विनाअनुमती मनोरंजनासाठी विविध पाळण्यांची उभारणी केली जात आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ‘मोबाईल ॲप’

आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना वारीविषयी माहिती मिळणे आणि अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यांसाठी ‘आषाढी वारी २०२२’ या ‘मोबाईल ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे.

सिंहगड येथे दरड अंगावर कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोक यांनी घटनास्थळी धाव घेतली अन् त्याला शोधण्याचे कार्य चालू केले.

मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी अद्याप पुष्कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे.