पाकिस्तान काश्मिरी युवकांचा बुद्धीभेद करून त्यांचे जीवन नष्ट करत आहे !

पाककडून इस्लामच्या नावाखाली बुद्धीभेद केला जात असल्याने मुसलमान तरुण त्याला बळी पडतात, हे १०० टक्के सत्य नसून त्यांच्यातच जिहादी मानसिकता असल्याने ते पाकच्या सहज आहारी जातात, हेही तितकेच स्पष्ट आहे !

बागलकोटे (कर्नाटक) : हिंदु धर्मांतराच्या तक्रारीनंतर ‘सेंट पॉल शाळा’ बंद

तक्रारीनंतर तत्परतेने अशा प्रकारचा निर्णय घेणार्‍या कर्नाटक प्रशासनाचे अभिनंदन ! अशी तत्परता सर्वत्र असली पाहिजे आणि त्यातही कुणी तक्रार करण्यापेक्षा प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी त्वरित कारवाई केली पाहिजे !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपची सत्ता

या निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचा निसटता पराभव झाला. सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून नाव निवडण्यात आले. त्यामध्ये देसाई विजय झाले. सावंत यांचा झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विजयदुर्ग किल्ल्यावर आज दीपोत्सव

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित आणि विजयदुर्ग, रामेश्‍वर अन् गिर्ये या ३ ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने विजयदुर्ग किल्ल्यावर १ जानेवारी २०२२ या दिवशी दीपोत्सव ! नेत्रतपासणी शिबिर आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने विमान आणि बससेवा यांचे दर गगनाला भिडले : पर्यटकांची लूट

शासनाचे विमान आणि बससेवा यांच्या तिकिटांच्या दरावर कोणतेही नियंत्रण नाही का ?

पोलिसांच्या साहाय्यानेच गुंडांनी रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याची माहिती उघड : पोलीस निरीक्षक निलंबित

गुंडांना तोडफोडीसाठी साहाय्य करणारे कायदाद्रोही पोलीस अधिकारी ! अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. त्यांना सेवेतून काढून टाकून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला पाहिजे, तरच अन्य कुणी असे करू धजावणार नाही !

पुणे पोलीसदलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकांची आत्महत्या !

कमकुवत मन आत्महत्येकडे वळते. मनोबल वाढण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. पोलीस कमकुवत होत असतील, तर त्याचा वरिष्ठ पोलिसांनी गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे.

सातारा शहरात आढळला पहिला ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण !

१९ वर्षीय युवती न्यूयॉर्क येथे वास्तव्यास होती. तिच्या वडिलांसमवेत ती २३ डिसेंबर या दिवशी सातारा येथे आली. तिला त्रास होऊ लागल्यानंतर ‘ओमिक्रॉन’ची चाचणी करण्यात आली. ती सकारात्मक आली.

आरक्षणाविषयी विधीमंडळातील ठराव इतर मागासवर्गीय समाजाला वेड्यात काढणारा ! – आमदार विनायक मेटे, अध्‍यक्ष, शिवसंग्राम पक्ष

इतर मागासवर्गीय समाजाच्‍या आरक्षणाविषयी विधीमंडळात करण्‍यात आलेल्‍या ठरावाला कोणताही आधार नाही. हा ठराव निवडणूक आयोग मानणार आहे का ?